मुरूम मधील विविध बातम्या

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

श्री विठ्ठलसाई सहकारी कारखाना व ग्रामीण रुग्णालय मुरूमच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न…

श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी…

 

जिल्हा परिषद कन्या प्रशाला,मुरूम ता.उमरगा येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

मुरुम ता. येथील श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना ,मुरूम व ग्रामीण रुग्णालय, मुरूम यांच्या संयुक्त विद्यमाने Covid-19 ची काळजी घेऊन “आरोग्य शिबीरा” चे आयोजन करण्यात आले . सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ वसंत बाबरे व कार्यकारी संचालक श्री एम बी अथणी यांच्या हस्ते दीप प्रजवलन करून आरोग्य शिबिराचे उदघाटन करण्यात आले सदर आरोग्य शिबिरात एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र,मुरूम व NCD विभाग अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी, CBC, बी. पी. / शुगर/ HIV इ. तपासणी, तंबाखू विरोधात जनजागृती, HIV/AIDS विषयी समुपदेशन व तपासनी तसेच जनजागृती इ. विविध कार्यक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रमात वैद्यकीय अधीक्षक डॉ वसंत बाबरे यांनी आरोग्य विषयी माहिती, COVID-19 च्या काळात घ्यावयाची काळजी, स्वच्छता, तंबाखू चे दुष्परिणाम, शासनाच्या आरोग्यासाठी विविध योजना इ. विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच RBSK चे डॉ. गुंडाजी कांबळे यांनी मानसिक आरोग्य, वैयक्तिक व परिसर स्वच्छता या विषयी माहिती दिली. सदर कार्यक्रमात एकूण- 158 जणांनी आपली CBC, बी. पी. / शुगर व एकूण-158 जणांनी आपली HIV तपासणी व समुपदेशन करून घेतली. सदर शिबिरात ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक श्री संतोष थोरात, सुजित जाधव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ विजय भोसले, उमेश लोखंडे, अधिपरिचरिका इलाज शेख,, महेश घाटे, लखन भोसले तसेच कारखान्याचे इंजिनिअर अमोल अष्टेकर, सुरेश गायकवाड, शेतकी अधिकारी अतुल राखेलकर , कार्यालयीन अधीक्षक कल्याणी चौघुले, Head Time Keeper आनंद मानळे, Guest House In charge शिवराज सोलापूरे व सर्व अधिकारी, आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जि.प.प्रशाला( मुलांची),मुरुम तालुका उमरगा येथे श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री मधुकर मंमाळे सर यांनी केले. याप्रसंगी बोलताना श्री मंमाळे सर म्हणाले की, श्री संत संताजी जगनाडे महाराज यांनी समाजसुधारणेचे कार्य केलेले आहे, त्याचबरोबर संत तुकाराम महाराज यांची तुकाराम गाथामधील अभंग श्री. संत जगनाडे महाराज यांनी लिहिलेले आहेत.संत तुकाराम महाराजांचे ते लेखनिक होते. संत जगनाडे महाराजांनी सुध्दा स्वतः अभंग लिहिलेले आहेत. संतांची जयंती करण्यामुळे समाजामध्ये सर्वधर्मसहिष्णुता, अंधश्रद्धा निर्मूलन ,शिक्षणाचा प्रसार या गोष्टीचा प्रसार होण्यास मदत होते ,असे ते बोलताना म्हणाले.याप्रसंगी जयंती कार्यक्रमास केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक श्री विजयकुमार कोळी सर, तेली समाज सेवा संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री संतोषदादा कलशेट्टी, उपाध्यक्ष पत्रकार रविकिरण अंबुसे, तालुका उपाध्यक्ष राजकुमार अंबुसे,मुरूम शहरातील समाजबांधव सचिन अंबुसे शेखर अंबुसे, शिवलिंग अंबुसे आप्पू अंबुसे,दादा बिराजदार आदी.उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशालेतील सहशिक्षक श्री विजयकुमार देशमाने, श्रीमती प्रमिला तुपेरे, श्री.हरिभाऊ माकणे, श्री.सुभाष व्हटकर, श्री.राजू पवार, श्रीमती निर्मला परीट यांनी पुढाकार घेतला.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.विजयकुमार देशमाने यांनी मानले.

 

 

जिल्हा परिषद कन्या प्रशाला,मुरूम ता.उमरगा येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.बालाजी गाडेकर व कन्या प्राथ.शाळेच्या मुख्याद्यापिका श्रीमती बिना पोतदार यांनी प्रतिमेचे पूजन केले.या कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक श्रीमती दुगम ए.आर.,श्री.घाटवाले एन.एम, श्री.कडते बि एस.,श्रीमती जाधव व्ही.जे., व्ही.श्री.ख्याडे आर.ए,श्रीमती गायकवाड ए.एस,श्रीम.पवार एल डी,श्री.टोम्पे वी एस. आदी उपस्थित होते.जिल्हा परिषद कन्या प्रशाला,मुरूम ता.उमरगा येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.बालाजी गाडेकर व कन्या प्राथ.शाळेच्या मुख्याद्यापिका श्रीमती बिना पोतदार यांनी प्रतिमेचे पूजन केले.या कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक श्रीमती दुगम ए.आर.,श्री.घाटवाले एन.एम, श्री.कडते बि एस.,श्रीमती जाधव व्ही.जे., व्ही.श्री.ख्याडे आर.ए,श्रीमती गायकवाड ए.एस,श्रीम.पवार एल डी,श्री.टोम्पे वी एस. आदी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment