बाबा जाफरी सोशल फाउंडेशन दाळींब आयोजित रक्तदान शिबिरात १११ रक्तदात्यांनी केले रक्तदान… कोरोना काळातील रेकॉर्ड ब्रेक रक्तदान…

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

बाबा जाफरी सोशल फाउंडेशन दाळींब आयोजित रक्तदान शिबिरात १११ रक्तदात्यांनी केले रक्तदान…

कोरोना काळातील रेकॉर्ड ब्रेक रक्तदान…

मुरूम ता.१०,  गेल्या 15 दिवसापासून रक्त पेडीत 1ही रक्त पिशवी शिल्लक नाही रक्त दान शिबिर घेतलात तर बरे होईल असे डॉ. पतंगे यांनी फोन केले होते, श्रीकृष्ण रक्तपेढीचे आव्हान स्वीकारून अवघ्या 2 दिवसातच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, बाबा जाफरी सोशल फाउंडेशन मार्फत डाळिंब येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीस युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या वेळी राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, व डॉ. दामोदर पतंगे यांनी उपस्थित राहून विशेष अभिनंदन केलं.

यावेळी फाउंडेशन चे अध्यक्ष बाबा जाफरी व त्यांचे सर्व सहकारी, सरपंच सोमनाथ कुंभार, उपसरपंच इरफान झागिरदार, डॉ. महेबुब मुलांनी, डॉ. अमर पावडशेट्टी, सदस्य असिफ शिलार, महंमद शेख, सलमान कमाल, बालाजी सातपुते, परशुराम देवकाते, दयानंद देवकाते, शिवानंद शिरोळे, बसवराज सारने, असिफ मुल्ला, इकबाल चौधरी हे उपस्थित होते, फाउंडेशन च्या सदशयांनी व युवक मित्रांनी पावसाचा व्यत्यय आलेला असताना देखील मेहनत घेऊन शिबिर यशस्वी केले. श्रीकृष्ण रक्त पेढीच्या कर्मचाऱ्यांच्या मते ह्या कोरोना काळात झालेल्या शिबिरा पैकी हे १११ चे हायेस्ट रेकॉर्ड ब्रेक शिबिर व रक्त पेडीत १ थेंब ही रक्त शिल्लक नसतानाचे खूप महत्वाचे शिबीर ठरले.

प्रा.अभयकुमार हिरास, डॉ. सागर पतंगे, प्रा. मारूती खमीतकर, योगेश सोनकांबळे, बाळू पवार, सुशांत सावंत, जगदिश हिरवे, ऋतीक म्हेत्रे यांनी श्रीकृष्ण रक्तपेढीच्या वतीने रक्तसंकलन केले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment