शहीद भगतसिंहाची 113 वी जयंती मुरूम शहरात उत्साहात साजरी…!!
मुरूम ता.२८, २८ सप्टेंबर हा भगतसिंहांचा जन्मदिवस..! या प्रेरणादायी दिनी त्यांच्या शास्त्रीय, वैज्ञानिक, मानवतावादी आणि समाजवादी विचारांचे स्मरण होते. भगतसिंहांच्या विचारांप्रमाणे आचरण करण्याची प्रेरणा आपल्या ठिकाणी निर्माण व्हावी. आजचा तरुण जो सर्वात बुध्दीवान आहे. त्यांनी थोडे जरी भगतसिंह यांचे चरीत्र वाचले तरी त्यांच्या काळजात उदात्त अशा उच्च राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंगाचे तेज निर्माण होईल अन् तोच तरुण स्वहितासह देशाच्या विकासासाठी, हितासाठी नक्कीच योगदान देईल. शहीद भगतसिंह यांच्या विचारांचा भारत जेंव्हा घडेल तेंव्हाच खऱ्या अर्थाने भगतसिंह यांना आदरांजली वाहिलेली असेल. त्यासाठी आपण सारे मिळुन भगतसिंहांच्या स्वप्नातील सुंदर भारत सत्यात उतरवण्यासाठी लढत राहुयात, असे विचार यावेळी मांडण्यात आले.वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, AISF, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने शहीद भगतसिंह यांची ११३ वी जयंती मुरुम शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे मुरुम शहराध्यक्ष आवेजभाई ढोबळे व शहरातील ज्येष्ठ व्यक्तीमत्व प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते भगतसिंहाच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी VBVP चे माजी जिल्हाध्यक्ष मोहन जाधव यांनी प्रास्ताविक, तसेच विभागीय उपाध्यक्ष किरण गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. AISF चे शहराध्यक्ष सागर धुमुरे यांनी सूत्रसंचालन केले, तर वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे मुरुम शहर उपाध्यक्ष संतोष कांबळे यांनी आभार मानले. यावेळी मसेसचे शहराध्यक्ष श्रीधर इंगळे, श्री बालकुंदे, चाँद पाशा, वैभव शिंदे, आकाश शिंदे, प्रशांत शिंदे, दीपक पाटील, वसीम मुजावर, आशु गायकवाड, संतोष कांबळे, उत्कर्ष गायकवाड, शुभम सावंत, जगदीश राठोड, गोपाळ इंगोले, प्रसाद, गणेश कडगंचे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते…!!
Leave A Comment