कारखान्यात उत्पादित ऑक्सीजन सिलेंडर्स पैकी 80 टक्के सिलेंडर्स पुरवठा करण्याकरीता राखीव
उस्मानाबाद,दि.10(जिमाका):-महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम, 2020” प्रसिद्ध केले असून करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,उस्मानाबाद यांनी प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार उस्मानाबाद जिल्ह्यामधील कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुषंगाने उभारण्यात आलेल्या जिल्ह्यातील सर्व CCC, DCH व DCHC च्या ठिकाणी रुग्णांना देण्यात येणा-या ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत रहावा. यासाठी पुढील तक्यात नमूद ऑक्सीजन सिलेंडर्स पुरवठादार यांना त्यांचे कारखान्यात उत्पादित होणा-या एकुण ऑक्सीजन सिलेंडर्स पैकी 80 टक्के ऑक्सीजन सिलेंडर्स उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व, CCC, DCH व DCHC च्या ठिकाणी पुरवठा करणेकरिता राखीव ठेवणेबाबत आदेश जारी केले आहेत. ऑक्सीजन सिलेंडर्स पुरवठादार संस्था-श्री. वैभवकुमार गिल्डा, प्रो. प्रा., मे. गोरज गॅसेस, सर्व्हे नं. 386, तामलवाडी ता. तुळजापूर. यांनी उपरोक्त नमूद ऑक्सीजन पुरवठादार संस्थेने त्यांचेकडील उत्पादित होणा-या एकुण ऑक्सीजन सिलेंडर्स पैकी 80 टक्के ऑक्सीजन सिलेंडर्स उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व CCC, DCH, DCHC याठिकाणी पुरवठा करणेकरिता राखीव ठेवावेत व त्याबाबतचा अनुपालन अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे सादर करावा. महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांनी वरील नमूद ऑक्सीजन पुरवठादार संस्थेने त्यांच्याकडील उत्पादित होणा-या एकुण ऑक्सीजन सिलेंडर्स पैकी 80 ऑक्सीजन सिलेंडर्स उस्मानाबाद जिल्हयातील सर्व CCC, DCH, DCHC याठिकाणी पुरवठा करणेकरिता राखीव ठेवले असलेबाबत खात्री करावी व त्याबाबत दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी,उस्मानाबाद यांचेकडे सादर करावा. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे, असे ही आदेशात नमुद केले आहे.
Leave A Comment