आलूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या १७ पैकी ९ गावात ९० कोरोनाचे रुग्ण आढळले..
मुरुमः उमरगा तालुक्यातील आलूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या १७ पैकी नऊ गावात आतापर्यंत कोरोनाचे ९० रुग्ण आढळले असून त्यापैकी ६० जणांनी मंगळवारपर्यंत कोरोनावर यशस्वीपणे मात करुन घरी परतले आहेत.तर सात जणांचा या आजाराने आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.यामध्ये आलूर येथे सर्वाधिक तीन तर मुरळी,कदेर,केसरजवळगा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा यात समावेश आहे. आलूर प्राथमिक केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावापैकी सर्वाधिक ३४ रुग्ण कदेर गावात आढळले असून यातील १६ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे तर एकाचा मृत्यू झाला आहे.सध्या १७ जणांवर घरी उपचार सुरु आहेत.यानंतर आलूरमध्ये २५ बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी १९ जण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.सध्या होम आयसोलेशनमध्ये तीन जणांवर उपचार सुरु आहेत.मुरळी मध्येही अकरा जणांना कोरोनाची लागण झाली होती त्यात नऊ जण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.तर एकाचा मृत्यू झाला आहे.केसरजवळगा येथे पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती यापैकी चार जण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.तर एकाचा मृत्यू झाला आहे.बेळंबमध्ये पाच जण आढळले असून पाचही जण उपचारानंतर बरे होऊन घरी आले आहेत.बेळंब तांडा येथे चार रुग्ण आतापर्यंत आढळले असून यात एकाने कोरोनावर मात केली आहे.तर उर्वरीत तीन जणांवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.कोथळी येथे चार रुग्ण आढळले होते चारही रुग्ण उपचारानंतर कोरोनावर मात करुन घरी आले आहेत.सेवानगर व सरदार नगर तांडा येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळले होते या दोघांनीही कोरोनावर मात केली आहे.अशा नऊ गावातील ६० जणांनी आतापर्यंत कोरोनाला हरवले आहे.तर उर्वरीत आठ गावात आतापर्यंत कोरोनाने एन्ट्री केलेली नाही.यामध्ये आलूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आलूर तांडा, ज्योती तांडा, वरनाळ, फुलसिंगनगर, अंबरनगर,कोथळी तांडा,आचार्य तांडा,व्यंकटेशनगर तांडा या आठ गावांचा समावेश आहे.अशी माहिती आलूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश पेठकर यांनी दिली.
Leave A Comment