जागतिक एड्स दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविणेबाबत बैठक संपन्न
मुरूम ता.२९, दि.०१ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त उमरगा येथील आयसिटीसी विभागामार्फत विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती संदेश कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्याअनुषंगाने दि.२९ रोजी उमरगा येथील उपजिल्हारुग्णालयात बैठक संपन्न झाली. जागतिक एड्स दिन १ डिसेंबर २०२२ निमित्त दिनांक १ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२२ या कालावधीत उमरगा तालुक्यात व्यापक जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत संदेश देऊन त्यांना एच आय व्ही तपासणी करण्याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी, सदरील जनजागृती मोहीम मध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन एन सी सी, एन एस एस विद्यार्थी-विध्यार्थीनीना, तसेच सामाजिक संस्था सहभागी होण्यासाठी दि.२९ वार मंगळवार रोजी उपजिल्हा रुग्णालयात उमरगा येथे शहरातील सर्व कॉलेज व सामाजिक संस्था यांची बैठक वैधकीय अधीक्षक डॉ विनोद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करून पुढीलप्रमाणे प्रमाणे कार्यक्रमाची आखणी करण्यात आली.
* आदर्श महाविद्यालय ते हुतात्मा स्मारक या मार्गावर सकाळी १०: ३० ला जागतिक एड्स दिन जनजागृती रॅली काढणे.
* महाविद्यालयात रांगोळी, पोस्टर, घोष वाक्य, इ स्पर्धा आयोजित करणे.
* ऑन लाईन( झूम मिटींग ) द्वारे तज्ञांचे मार्गदर्शन आयोजन करणे सदरील लिंक समाज माध्यमावर पाठविणे
* महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबीर, व युवा संवाद चे आयोजन करणे.
* श्री कृष्ण महाविद्यालय यांनी रॅली दरम्यान तहसील ऑफिस व बस स्टँड येथे एच आय व्ही / एड्स बाबत कलंक व भेदभाव मिटविणे या विषयावर पथ नाट्य सादर करणे.
* समाजविकास संस्था यांच्या मार्फत hiv/aids बाबत माहिती पत्रके व बॅनर मिळतील.
* रॅलीत सामाजिक व राजकिय क्षेत्रातील नेते यांना आमंत्रित करणे.
* रॅली चे उदघाटन श्री छ. शिवाजी कॉलेज येथे होईल(मान्यवरांच्या हस्ते)
व समारोप हुतात्मा स्मारक येथे होईल.
वरील बैठकिस प्रा. डॉ बी आर शिंदे (आदर्श महाविद्यालय उमरगा),प्रा. हुळमुजगे डी के(श्रमजीवी डी एड कॉलेज) ,प्रा.डॉ व्ही डी देवरकर (छ. शिवाजी महाविद्यालय उमरगा) रोटरी क्लबचे सुतार पी आर, प्रा. पाटील ऐ के ( श्रमजीवी फार्मसी कॉलेज उमरगा) ऍड.शेख (ऍड शीतल चव्हाण फौंडेशन उमरगा), भूमिपुत्र वाघ ( समाज विकास संस्था उमरगा) , निखिल वाघ ( GXFAM India) ,अभय भालेराव, व अनिल चव्हाण (ICTC Omerga) आदी उपस्थित होते.
Leave A Comment