सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

उमरगा :
महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणाच्या आश्वासनासाठी विशेष अधिवेशन घेऊन  कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील याचे अमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत असताना राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याने शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीने उमरगा शहरातून राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.


मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी अनेक आंदोलने केली आहेत. मराठा आरक्षणासंबंधी सग्यासोय-यांच्या अदयादेश लागू करण्यात यावा या मागणीसाठी १० फेब्रुवारी पासून त्यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांची प्रकृती खालावत असताना राज्य सरकार याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. याबाबत आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी (दि.१६) उमरगा शहरातून राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी हालकी वाजवत मराठा समाजाच्या वतीने एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच, जराऔगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, राज्य सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत संपूर्ण शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. या प्रतिकात्मक अंत्ययात्रेत शेकडो मराठा बांधव सहभागी झाले होते.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment