शहरात एक रुग्ण पॉझिटिव्ह एकूण ६९ . रुग्ण मुरुम, ता.१४ (प्रतिनिधी) : उमरगा तालुक्यातील मुरुम शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून शहरात एकूण रुग्णांची संख्या ६९ झाली आहे. शहर व परिसरातील नागरिकांनी कोरोनाविषयी भिती न बाळगता कोणत्याही व्यक्तीला याची लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून काळजी घेऊन आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता.१४) रोजी अँटीजन चाचणी केली. यातील दोघे पॉझिटिव्ह आले.
यापैकी एकजण वेळंब तर दुसरा मुरूम येथील पेट्रोल पंपावरील ८ कामगार तपासणी पैकी एक पॉजीटिव्ह आढळला आहे. दि. १४ रोजी एकूण १२ रॅपिड टेस्ट झाले असून त्यात मुरूम १ व्यक्ती व बेलंब १ व्यक्ती असे दोन व्यक्ती पॉजीटिव्ह आले आहेत. या अगोदर ३१ पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. सध्या विलगीकरण कक्षामध्ये १८ व आयसोलेशन वॉर्ड मध्ये १ आणि १० जणावर घरी उपचार तर १३ रुग्णांवर पुढील उपचारासाठी सोलापूर, लातूर, उस्मानाबाद व उमरगा येथे रेफर करण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.सत्यजित डुकरे यांनी सांगितले.
Leave A Comment