ऍड राजासाहेब पाटील यांची किसान काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड
मुरूम ता.१८, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती तथा उस्मानाबाद जिल्ह्यातील काँग्रेसचे युवा नेते ऍड राजसाहेब पाटील यांची अखिल भारतीय काँग्रेसच्या किसान काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष(मराठवाडा विभाग) पदी निवड करण्यात आली आहे. किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून प्रदेश अध्यक्ष ऍड माधव जाधव यांनी त्यांना नुकतेच नियुक्ती पत्र दिले आहे
ऍड राजासाहेब पाटील हे प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील यांचे पुतणे तर मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गणपतराव पाटील यांचे चिरंजीव आहेत राजासाहेब पाटील यांनी पक्ष संघटनेतील तालुका व जिल्हा स्थरावरील विविध पदे भूषविले आहेत ते नेहमी पक्ष संगठन कामात सक्रिय राहतात त्यांच्याकडे संगठन कौशल्यचा चांगला अनुभव आहे
ते स्वतः प्रगतिशील शेतकरी असल्याने शेतकऱ्यांची व्यथा त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असल्याने ते शेतकऱ्यां विषयी नेहमी पक्ष स्थरावर शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नासाठी पुढाकार घेतात त्यांच्या मध्ये शेतकऱ्यां विषयी असलेली आत्मीयता व तळमळ पाहून व सध्या मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसमोर असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्ष्याच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना किसन कॉग्रेसच्या मराठवाडा विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांचा या निवडी बद्दल किसन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधानसभेचे सभापती नाना पटोले, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,माजी मंत्री दिलीपराव देशमुख, मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूराव पाटील,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्यासह विविध विभागाचे पदाधिकारी शेतकरी कार्यकर्ते आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Leave A Comment