उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी पदी कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती
लोकप्रिय जिल्हाधिकारी सौ.दीपा मुधोळ-मुंडे यांची बदली
उस्मानाबाद – उस्मानाबादच्या लोकप्रिय जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांची लातूरला महापालिका आयुक्त म्हणून बदली झाली आहे तर उस्मानाबादचे नवे जिल्हाधिकारी म्हणून कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दीपा मुधोळ – मुंडे यांनी कोरोना संसर्ग काळात अत्यंत प्रभावी काम केले आहे, कित्येक दिवस उस्मानाबाद ग्रीन झोन मध्ये होता. त्यांच्या धाडशी निर्णयामुळे व नागरिकांना समाधानकारक मिळत असलेल्या उत्तरामुळे अल्पावधीतच त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात लोकप्रिय जिल्हाधिकारी म्हणून ख्याती निर्माण केली होती.
नवे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे मूळचे लातूर येथील असून यापूर्वी ते पुण्याला भूजल सर्व्हेक्षण विकास यंत्रणेमध्ये संचालक म्हणून कार्यरत होते.
Leave A Comment