Basav Pratishthan News: ग्रामपंचायत कार्यालय केसरजवळगाच्या वतीने दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

ग्रामपंचायत कार्यालय केसरजवळगाच्या वतीने दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
मुरुम, ता.६ (प्रतिनिधी) : केसरजवळगा, ता.उमरगा येथील ग्रामपंचायत कार्यालय व समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम गुरुवारी (ता.६) रोजी आयोजित करण्यात आला.

गांधी विद्या मंदिर प्रशालेचा माध्यमिक शालांत परीक्षेत प्रशालातून ऐश्वर्या युवराजसिंग राजपूत ९३.२५ टक्के गुण मिळवून प्रथम, अंकिता लक्ष्मीपुत्र सनगुंदे ९१ टक्के गुण घेऊन द्वितीय तर अनिषा अनिल गुरव ८९.६० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळविल्याबद्ल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रशालेतून प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थिनीला बसवेश्वर मनी लेंडरसचे मालक हणमंत शिवमुर्ती यांच्या वतीने अनुक्रमे २००१ व १००१ रुपयाचे रोख पारितोषिक देण्यात आले. प्रशालेतून प्रथम येणारी ऐश्वर्या राजपूत या विद्यार्थिनीचा सत्कार हणमंत शिवमुर्ती यांच्या हस्ते तर द्वितीय आलेली कुमारी अंकिता सनगुंडे या विद्यार्थिनीचा सरपंच बलभीम पटवारी व राजकुमार माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रशालेतील तृतीय येणारी कुमारी अनिषा गुरव या विद्यार्थिनीला सरपंच बलभीम पटवारी यांच्या वतीने ५०१ रुपये रोख शिवपुत्र जळकोटे, गुरबस भुरे यांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमात विजयकुमार कलशेट्टी यांच्या संकल्पनेतून टीव्ही नाईनचे पत्रकार रोहित पाटील यांच्या वतीने गरीब, होतकरु व कुठलाही आधार नसताना यश संपादन करणारी कुमारी अंकिता सनगुंडे या विद्यार्थिनीचा पाच हजार एक रुपये देऊन भारतसिंग राजपूत, बापूराव पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करून जयपालसिंह राजपूत, संजीव पाटील, नाजिम शेख, पत्रकार अझर इनामदार, गजानन पाटील, केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक नबीलाल शेख, युसूफ गवंडी, श्रीकांत जवळेकर, शैलेंद्र राजपूत व ग्रामस्थ उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजयकुमार कलशेट्टी तर आभार बालाजी भोसले यांनी मानले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment