कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांनी त्वरीत आधार प्रमाणीकरण करुन योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकरी दिवेगावकर

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांनी त्वरीत आधार प्रमाणीकरण करुन योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकरी दिवेगावकर

उस्मानाबाद,दि.23(जिमाका):- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एकूण 72962 लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 71290 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण असून 70318 शेतकऱ्यांचे कर्जखात्यावर रक्कम 508 कोटी 98 लाख रुपये रक्कम जमा करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्याकरीता आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे.जिल्हयातील 1666 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे.
तरी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही अशा शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे व योजनेचा लाभ घ्यावा.तसेच,आधार प्रमाणीकरण प्रक्रिया दरम्यान कर्जखाते रकमेत कोणतीही तफावत असल्यास “रक्कम अमान्य” पर्याय उपयोगात आणण्यापुर्वी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधून कर्जरकमेची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व जिल्हा उपनिबंधक सरकारी संस्था उस्मानाबाद यांनी केले आहे.
*****

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment