डॉ.बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालय इमारतीचा भूमिपुजन सोहळा बसवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न…

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालय इमारतीचा भूमिपुजन सोहळा बसवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न

मुरुम, ता. २२ (बातमीदार) : भीमनगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालयाच्या नविन इमारतीचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी (ता.२२) रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अनिता अंबर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूराव पाटील, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरण पाटील, उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव, उपनगराध्यक्ष सहदेव गायकवाड, नगरसेवक रशीद शेख, विजयालक्ष्मी भालेराव, अजित चौधरी, श्रीकांत बेंडकाळे, आयुब मासुलदार, प्रमोद कुलकर्णी, योगेश राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राम कांबळे यांनी धम्म वंदना म्हणून शुभारंभ केला. यावेळी भारतीय संविधान ग्रंथ देऊन बसवराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सदर वाचनालय हे १९५५ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत स्थापन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झुंबर बनसोडे, महेंद्र गायकवाड, रूपचंद गायकवाड, महेंद्र कांबळे, बलभीम कांबळे, राहुल कांबळे, विजय कांबळे, प्रशांत गायकवाड, चंद्रकांत गोडबोले, भगवान कांबळे, राजेश गायकवाड, महेश लिमये, अजिंक्य कांबळे, किरण गायकवाड, आनंद कांबळे, सिद्धांत गायकवाड, प्रणित गायकवाड, प्रशांत मुरूमकर, समर्थ गोडबोले, आबाराव कांबळे, प्रा.महेश कांबळे, सिद्धांत सोनवणे, प्रणाली कांबळे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अण्णाराव कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष कांबळे तर आभार प्रा. डॉ. नागनाथ बनसोडे यांनी मानले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment