हनुमान युवक गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न, ४५ गणेश भक्ताने केले रक्तदान

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

हनुमान युवक गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न, ४५ गणेश भक्ताने केले रक्तदान

मुरूम ता.१५, येथील हनुमान युवक गणेश मंडळाच्या वतीने मुरूम येथील माहेश्वरी भवनात गणेशोत्सवानिमित्त दि.१५ सप्टेंबर वार बुधवार रोजी सालाबादप्रमाणे याहीवर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

चरमूर्ती मठाचे मठादिपती श्री.सिद्धमल्लय्या शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते या शिबीराचे उदघाटन करण्यात आले. दरवर्षी येथील रक्तदान शिबिरात शेकडो तरुण युवक रक्तदान शिबिरात भाग घेऊन रक्तदान करतात, अतिशय स्तुत्य असे सामाजपयोगी उपक्रम मंडळाच्या वतीने दरवर्षी राबवले जाते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्तपेढीतील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन मंडळाच्या वतीने याहीवर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियमाचे पालन करत शिबीर संपन्न झाले, या शिबिरात ४५ युवकांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी हनुमान गणेश युवक मंडळ व तसेच सोलापूर येथील अश्विनी ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment