राज्यात रक्ताचा तुटवडा, मुरूम काँग्रेस कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न ४७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

राज्यात रक्ताचा तुटवडा, मुरूम काँग्रेस कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
४७ रक्तदात्यांनी केले रक्तदान..

मुरूम ता.०१ मे (प्रतिनिधी) : सध्या राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अल्पावधीत कोरोना लसीकरणास सुरुवात होणार असल्याने १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. लस घेतल्यानंतर किमान दोन महिने तरी रक्तदान करता येणार नसल्याने. सध्या मोठ्या प्रमाणात रक्ताची टंचाई भासत असल्याने महाविकास आघाडी सरकार व प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाचे औचित्य साधून प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापुराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील
यांच्या पुढाकाराने युवक काँग्रेस व काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी (ता.१) रोजी प्रतिभा निकेतन विद्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप भालेराव, कंटेकूरचे सरपंच गोविंद पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव महालिंग बाबशेट्टी, प्रगतशील शेतकरी संजय मिणीयार, माजी नगराध्यक्ष बबनराव बनसोडे, माजी उपनराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, शहर अध्यक्ष सुधीर चव्हाण, उल्हास घुरघुरे, काशीनाथ मिरगाळे, सुजित शेळके आदिंची प्रमुख उपस्थिती होती. या शिबीराकरिता राम डोंगरे, किरण गायकवाड, श्रीहरी शिंदे पाटील,देवराज संगुळगे, राजु मुल्ला, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राहूल वाघ, गौस शेख, प्रशांत मुरुमकर, उत्कर्ष गायकवाड, प्रणित गायकवाड, नेताजी गायकवाड आदींनी पुढाकार घेतला. या शिबिरात सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून आणि शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देवून ४७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांचा एक वर्षाचा पाच लाख रुपयाचा अपघाती विमा यावेळी उतरविण्यात आला. उस्मानाबाद शासकीय रक्तपेढीचे डॉ.अश्विनी गोरे, तंत्रज्ञ अक्षय जगताप, वैद्यकीय सामाजिक अधिक्षक गणेश साळूंके, परिचर महादेव कावळे, परिचारिका हिरवे आदिंनी शिबीर यशस्वी केले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment