श्री विट्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे बॉयलर अग्नी प्रदिपन सभारंभ संपन्न

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

श्री  विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे बॉयलर अग्नी प्रदिपन सभारंभ संपन्न

 

मुरुम ता. 11 श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना लि., मुरुम या कारखान्याचे कामकाज कारखान्याचे चेअरमन व माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या नियोजनबध्द मार्गदर्शनाखाली सुरु असून कारखान्याचा हंगाम 2020-21 साठीचा बॉयलर अग्नी प्रदिपन सभारंभ बसवराज पाटील यांच्या शुभहस्ते कारखाना कार्यस्थळावर आजरोजी संपन्न झाला. कारखान्याच्या हंगामासाठी करावयाची मशीनरीची कामे पुर्ण करण्यात आली असून, ऊस तोडणी वाहतुकीसाठी लागणारी यंत्रणा पुर्णपणे भरती करण्यात आली आहे. यावर्षी भागातील ऊसाची उपलब्धता विचारात घेता, कारखान्याच्या संचालक मंडळाने 5 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्ष्टि निश्चित केले आहे. तसेच कारखान्याचा गळीत हंगाम लवकरच सुरु होणार असून, गेल्यावर्षी गाळपास ऊस दिलेल्या शेतकरी बांधवांना प्र.मे.टन रु.100/- चा हप्ता हंगाम शुभारंभ होण्याआधी देण्यात येणार आहे. तरी कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व शेतकरी बांधवांनी आपल्या श्री विट्ठलसाई कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन बसवराज पाटील यांनी केले आहे. सध्या कोरोना (कोवीड-19) विषाणुजन्य आजाराचा प्रादूर्भाव लक्षात घेवुन, सदर कार्यक्रम साध्या पद्धतीने सोशल डिस्टन्स मास्क, सॅनिटायझर इत्यादीचा अवलंब करुन पार पाडण्यात आला. याप्रसंगी जिल्हा मध्य.सह.बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील, जि.प.विरोधी पक्षनेते शरण पाटील, कारखान्याचे व्हा.चेअरमन काझी, मा.संचालक सर्व, विट्ठलराव पाटील, केशवराव पवार, दिलीपराव पाटील, शरणप्पा पत्रिके, संगमेश्वर घाळे, विट्ठलराव बदोले, राजीव हेबळे, माणिकराव राठोड, दत्तु भालेराव, शिवलिंगप्पा माळी ऍड.विरसंगप्पा आळंगे, सुभाषचंद्र पाटील, श्रमजीवी महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप गरुड, आप्पासाहेब हळ्ळे, प्रमोद कुलकर्णी, मल्लिनाथ दंडगे आदी मान्यवर कार्यकारी संचालक श्री.एम.बी.अथणी व कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.

 

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment