मुरूम शहरात बैलपोळा सण उत्साहात साजरा.., बैलजोडीचे वाजत गाजत मिरवणूक…

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

मुरूम शहरात बैलपोळा सण उत्साहात साजरा..

बैलजोडीचे वाजत गाजत मिरवणूक…

मुरूम ता.१४, श्रावण महिन्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच दर्श अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात पोळा सण साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दर वर्षी बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारत हा कृषिप्रधान देश आहे, बैलांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधले जाते, दि.१४ वार गुरुवार रोजी शहरातील विविध भागातील शेतकरी बांधवानी बैलपोळा सणानिमित्त बैलांना आंघोळ घालून माठाटी, साध्या सिंगल गोंडयाचे माठाटी, गळ्यातील रेडिमेड कँडे, तयार केलेले मोरक्या,कासरे, लोकरी कंबरी कँडे, वेशनी, शिंगोटे, घागर मळ्या, रेशीम सूत, सुती सूत, झुल,बाशिंग, पितळी साखळी,घनट्या,बुरकड्या सह रंगरंगोटीने बैलांना सजवण्यात आले होते, प्रारंभी बैलांचे पूजन करून त्यांना पुरण-पोळ्यांचा निवेद देऊन, शेतकरी बांधव आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराना भोजना साठे आमंत्रित केले जाते, संध्याकाळी विविध भागातील शेतकरी आपल्या बैलांना वाजवत गाजवत छत्रपती शिवाजी महाराज चौक,महात्मा बसवेश्वर चौक,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक,अशोक चौक, टिळक चौक,किसान चौक,सुभाष चौक,गांधी चौक मार्गे मिरवणूक काढून हनुमान चौकातील हनुमान मंदिर येथे श्री हनुमानास प्रदक्षिणा घातले जाते, पिढयां पिढ्या चालत आलेली भारतीय परंपरा आजही जिवंत ठेवण्याचे कार्य शेतकरी बांधवाकडून केली जाते. मुरूम शहरातील किसान चौक, संभाजी नगर, नेहरू नगर, महादेव नगर, यशवंत नगर भागातील शेतकरी मोठ्या उत्सवाने बैल पोळा सण साजरा करतात….

अधिक माहितीसाठी Ramling Purane युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा…

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment