उमेदवारांनी वेबसाईटवर आपला आधार क्रमांक व प्रोफाईल तात्काळ अपडेट करण्याचे आवाहन

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

उमेदवारांनी वेबसाईटवर आपला आधार क्रमांक व प्रोफाईल तात्काळ अपडेट करण्याचे आवाहन

उस्मानाबाद,दि.27:-महाराष्ट्र शासन,कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने नोकरी इच्छुक उमेदवारासाठी एम्पलॉयमेंट नोंदणी कार्ड www.mahaswayam.in हे वेबपोर्टल विकसीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व नोकरी इच्छुक उमेदवार,कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊ इच्छिणारे उमेदवार तसेच या वेबपोर्टलवर नोंदणी केलेले सर्व उमेदवार ज्यांनी अद्याप पर्यंत आपले आधार कार्ड एम्पलॉमेंट कार्डशी लिंक केलेले नाही. त्यांनी वेबसाईटवर आपला आधार क्रमांक व प्रोफाईल तात्काळ अपडेट करुन घ्यावी. संबंधित उमेदवारानी आपला आधार क्रमांक व प्रोफाईल तात्काळ अपडेट (अद्यावत) न केल्यास आपली नोंदणी दि.31 ऑगस्ट 2020 अखेर रद्द होईल.कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता महाराष्ट्र राज्य यांचे वतीने असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद यांनी केले आहे.

 

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment