केसर जवळगा येथे सर्प दंशाने शेतकरी महिला दगावली मुरूम/प्रतिनिधी शेतात काम करत असताना विषारी सापाने दंश केल्याने 36 वर्षीय शेतकरी महिला दगावली आहे सदरील घटना केसरजवळगा येथे घडली आहे केसर जवळगा येथील शेतकरी महिला निर्मला हणमंत लकडे वय 36 ह्या शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास शेतात गेल्या होत्या शेतातील ज्वारीचे कडबा काढताना सापाने दंश केल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाताना
मरणोत्तर देहदान करणारे आदर्श शिक्षक कमलाकर मोटे यांचा सेवापुर्तीबद्ल सत्कार मुरुम, ता. उमरगा, ता. ८ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तथा मरणोत्तर देहदान करणारे जिल्हा परिषद मुरुम बीटचे केंद्रप्रमुख कमलाकर श्रीमंतराव मोटे यांचा रविवारी (ता. ७) रोजी रत्नमाला मंगल कार्यालयात मोटे परिवाराच्यावतीने सेवापुर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी त्यांचा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत येथोचित सत्कार करण्यात आला.
ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मुरूम शहरात प्रा. नितीन बानूगडे पाटील यांची जाहीर सभा संपन्न मुरुम, ता. २४ (प्रतिनिधी) : उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक महायुतीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार ओमराजे उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मंगळवार (ता. २३) रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते प्रा. बानूगडे पाटील यांची जाहीर सभा पार पडली. या प्रचार सभेत उमेदवार ओमराजे निंबाळकर, बाबा
उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 19 लक्ष 92 हजार मतदार बजावणार 7 मे रोजी मतदानाचा हक्क 81 तृतीयपंथी मतदारांचा समावेश * 2139 मतदान केंद्र * 10 लक्ष 52 हजार स्त्री व 9 लक्ष 40 हजार पुरुष मतदार धाराशिव, दि.21 (माध्यम कक्ष): 18 व्या लोकसभेसाठी 7 मे रोजी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार
मुरूम शहरात रामनवमी निमित्त भव्यदिव्य शोभायात्रा संपन्न… सोळा फूट उंचीची प्रभू श्री रामाची आकर्षक मूर्ती ठरले केंद्र बिंदू… मुरूम ता.२१, येथील श्री राम भक्तांच्या वतीने रामनेमीचे औचित्य साधून दि.२० वार शनिवार रोजी मुरूम शहरातील श्रीराम चौकापासून प्रभू श्रीरामाच्या १६ फुटी मूर्तीचे भव्यदिव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. श्री राम चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,महात्मा बसवेश्वर चौक,साठे चौक,अशोक चौक मार्गे शोभायात्रा शहरातील श्री
जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन, दोनशे विद्यार्थ्यांचा सहभाग… मुरूम। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे उपक्रम…. मुरूम ता.२१, येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी विविध सामाजिक,शैक्षणिक,व्याख्यान,निबंध स्पर्धा,वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते. दि.२१ वार रविवार रोजी मुरूम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात मंडळाच्या वतीने जिल्हा स्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी
रक्तदानाने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन,८९ रक्तदात्यांनी केले रक्तदान…. मुरूम – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या निमत्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, आंबेडकर चौक, यशवंत नगर च्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, यामध्ये मुरूम शहरातील एकूण 89 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी ग्रामीण रुग्णालय मुरुम चे अधीक्षक डॉ.सत्यजित डुकरे, नळदुर्ग येथील माजी नगरसेवक सचिन डुकरे, डॉ. गिरीश मिनीयार, भगत
मुख्यमंत्री शिंदे 17 फेब्रुवारीला धाराशिव जिल्ह्यात धाराशिव,दि.16(जिमाका):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 17 फेब्रुवारी रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे.त्याचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 17 फेब्रुवारी रोजी कर्नाटक राज्यातील बिदर विमानतळ येथे आगमन व मोटारीने उमरगाकडे प्रयाण.रात्री 10 वाजता उमरगा येथील श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या कै.शिवाजीराव (दाजी) मोरे क्रीडा संकुल येथे आमदार श्री.ज्ञानराज चौगुले यांच्या मुलाच्या विवाहास उपस्थित राहून रात्री 10.45 वाजता मोटारीने
सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा उमरगा : महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणाच्या आश्वासनासाठी विशेष अधिवेशन घेऊन कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील याचे अमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत असताना राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याने शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीने उमरगा शहरातून राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील