वायपट खर्चाला फाटा देत, सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरे…
मुरूम ता.०२ येथील लघु उद्योजक प्रगती फूड्स चे मालक विकास शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाचे वायपट खर्च वाचवून सामाजिक बांधिलकी जोपासत माळी गल्लीत दोन सिमेंट बाकडे भेट देऊन सहकार्य केले.
मुरूम शहरात सामाजिक बांधिलकीचा उपक्रम करणारे श्री शरणजी पाटील मिञमंडळाचे सहकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सिंमेट बाकडे शहरातील माळी गल्लीत ठेवले त्यांचा लोकार्पण कार्यक्रमास..
श्री शरण पाटील मिञमंडळ अध्यक्ष राजू मुल्ला,काँग्रेस तालुका उपाध्यक्ष राहूल वाघ,देवराज संगुळगे,नाना बेंडकाळे,किरण गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.
या स्तुत्य उपक्रमाने मुरूम शहरातील तारुण्य सामाजिक चळवळीत सक्रिय होत असल्याचे नागरिकांतून चर्चा होत आहे व तसेच विकास शिंदे यांच्या उपक्रमाचा सर्वत्र कौतुक होत आहे.
Leave A Comment