जनसेवेच्या माध्यमातून भाजपा वैधकीय आघाडीच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

जनसेवेच्या माध्यमातून भाजपा वैधकीय आघाडीच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी

पुणे,ता.२५, भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या वतीने दि.२५ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती जनसेवा करून साजरी करण्यात आली. हडपसर येथील सिद्धी वृद्धाश्रमाच्या वृद्धाना शाल,मास्क,सॅनिटायझर, खाऊचे वाटप करून पं. दीनदयाल उपाध्याय यांची जयंती जनसेवा म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी सद्याच्या महामारीच्या काळात घ्यावयाची काळजी याचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.भाजपा वैधकीय आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अजित गोपचडे,पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब हरपळे, पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ.उज्वला हाके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.यावेळी स्वयंसेवक संघाचे अशोक सोरगावकर,आरोग्य हेल्प लाईनचे संचालक डॉ.रोहित बोरकर,स्मितसेवा फौंडेशनच्या अध्यक्षा स्मिता गायकवाड,भाजपा हवेली तालुका चिटणीस जयकुमार चव्हाण व सिद्धी वृद्धाश्रमाच्या संस्थापिका छाया सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment