मुरूम शहरात चौडेश्वरी यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न..

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

मुरूम शहरात चौडेश्वरी यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न..

मुरूम ता.३०, येथील धुम्मा गल्लीतील चौडेश्वरी मंदिरात सालाबाद प्रमाणे चौडेश्वरी यात्रा अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. दरवर्षी बदामी अमावशेला चौडम्मा (चौडेश्वरी) यात्रा संपन्न होते, परंपरेनुसार यावर्षीचा पूजन सोहळा धुम्मा परिवाराच्या वतीने संपन्न झाला. मुरूम शहरातील सर्व धर्मीय भाविकांची देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. सकाळी महापूजन व आरतीनंतर समितीच्या वतीने भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, शेकडो भाविकांनी महाप्रसादाचे लाभ घेतले. जेष्ठ नागरिक रुद्रा खानमाडे दिवसभर देवीची उपासना करतात, सायंकाळी साडेपाच वाजता देवीच्या मुकुटाचे खानमाडे यांच्या चेहऱ्यावर पेहराव करून गावातील अशोक चौकातील लक्ष्मी मंदिरा पर्यंत मिरवणूक काढण्यात येते, धुम्मा गल्लीतील धुम्मा विहीरी जवळ त्याचे सांगता होते, मिरवणुकीत धनगर समाजाच्या वतीने पारंपारिक वाद्य ढोल वाजवून देवीचे सेवा करतात, त्यानंतर चौडेश्वरी देवीचे विधिवत पूजा करून मंदिरात स्थानापन्न करून गाबाऱ्याला कुलूप लावण्यात येते, व पुढील वर्षीच याच तिथी मध्ये कुलूपबंद गाबाऱ्यातील देवीचे यात्रेसाठी द्वार उघडले जातात, बंद गाबाऱ्यातील देवीला दररोज पूजा अर्चना संपन्न होत असते,मंदिर समितीचे अध्यक्ष प्रशांत धुम्मा, उपाध्यक्ष पापुशा धुम्मा, सचिव बंडप्पा धुम्मा, खंडू धुम्मा, सचिन धुम्मा, किशोर कारभारी, गणेश धुम्मा, सागर कंटेकुरे,मल्लिनाथ बोराळे, ओमकार शेळके,अप्पू ख्याडे,दीपक राजपूत, मारूती कारडामे,सागर कारडामे, शेखर धुम्मा, रणजित राजपूत, गुंडेश धुम्मा, राजेंद्र धुम्मा, धनु धुम्मा,संतोष धुम्मा,इरेश खानमाडे, बसू गुंडगोळे आदींनी यात्रा महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment