फळे , भाज्या टिकवण्यासाठी बनवले शुन्य रुपये खर्चात शितकक्ष
मुरुम ता.११, येथील युवक व बीड येथील आदित्य कृषि महाविद्यालय येथील विद्यार्थी अल्तमश अजिजसाब खुदादे याने शेतकऱ्यांच्या हितासाठी फळे-भाज्या टिकण्यासाठी शून्य रुपये खर्चात मुरुम येथे शितकक्ष बनवले आहे.
है प्रयोग अजीज खुदादे यांच्या शेतात करण्यात अला आहे, कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषिदुत अल्तमश अजिजसाब खुदादे याने प्रत्यक्ष कृतितुन शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली आहे आणि शून्य रुपये खर्चात शितकक्ष कस बनवला जाऊ शकतो याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आहे .
विटाच्या साह्याने कुंड तयार करुन त्यात दोन कप्पे तैयार करायचे आणि त्यात फळे व भाजीपला ठेवावा. त्यानंतर पाण्यात भिजवलेले सूती पोते वरुन झाकावे. त्यामुळे हे माल 5 ते 6 दिवस खराब होत नाही. असे हे बिनखर्चाचे शितकक्ष असल्याचे अल्तमश याने सांगितले. या शितकक्षाचा वापर शेतकरी वर्गाने करावा जेणेकरून आपली फळे व भाज्या खराब होणार नाहीत. बाजरभाव आल्यास ती विकता येतील, असे अल्तमश याने सांगितले.
Leave A Comment