तांडा वस्तीचे संपर्क तुटले, शेतकऱ्यांचेही नुकसान,समशान भूमीत मोठा खड्डा…
मुरूम,उस्मानाबाद ता.१५, दि.१३ रोजीच्या मुसळधार पावसाने मुरूम व परिसरात आहाकार घातला, अनेक घरात पाणी घुसले तर किराणा दुकानदारसह अन्य दुकानदार व शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून शासनाने त्वरित मदत जाहीर करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
मुरूम-आस्टा कासार रस्त्यावरील नदीच्या पात्रावरील पाताळे पूलाचा एक भाग पाण्यात वाहून गेल्याने पाटील तांडा,अंबर नगर,आचार्य तांडा, आस्टा कासार सह अन्य गावाचे संपर्क तुटले आहे तर मुरूम मधील अनेक शेतकऱ्यांचे त्या रस्त्यावर शेती असल्याने सदरील पुला मुळे शेताकडे जाण्यास रस्ता बंद झाल्याने व त्या भागातील लोकांना गावाकडे येण्याचा मार्ग तुटल्याने अनेक समस्या निर्माण झाले आहेत, काही शेतकऱ्यांचे जनावरे शेतात असल्याने व तसेच अनेकांचे सोयाबीन ढिगा मारून ठेवल्याने लाखोंचे नुकसान झालेचे समजते.भीम नगर समशान भूमीत मोठा खड्डा पडल्याने मोठी हानी झाली आहे.
पाताळे शेताजवळ असलेल्या नदीवरील पूलाचे तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, त्या मार्गावरील रस्ता व भीम नगर समशान भूमीची व लाईट पोल यासह अन्य समस्या त्वरित दुरुस्त करावी व झालेल्या नुकसानीसाठी शासनाने त्वरित मदत जाहीर करावी असे मागणी नागरिकांतुन जोर धरत आहे.
Leave A Comment