कोरोनाचे राजकारण..!आपण सर्व जबाबदार..!!
सद्या महाराष्ट्र राज्य कोरोनाने ग्रासले आहे, त्याच पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन परिस्थिती उदभवली आहे, २०२० मध्ये सर्व स्तरातून लॉकडाऊनला जे प्रतिसाद मिळाले ते या २०२१ मध्ये मिळत नाही आणि त्याचे कारण ही तसेच आहे, वर्षभर लॉकडाऊन परिस्थितीत राहून आता परत लॉकडाऊन सामोरे जाण्याची मानसिकता राहिली नाही. कारण गेल्या वर्षीच आर्थिक घडी बसवायला अजून सावरा सावर चालू आहे परत आता लॉकडाऊन हे परवडणारे नाही…?
सर्व स्तरातून लॉकडाऊन उघडण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, परंतु शिक्षणासाठी मात्र कोणी पुढे येताना दिसत नाही, सर्व हानी भरता येईल परंतु ज्ञानाची हानी भरता येणार नाही यावरही विचार होणे गरजेचे आहे.
नागरिकांना शासनाच्या वतीने वारंवार सूचना देऊनही नागरिक याची दखल घेत नसल्याचे दिसून येते, अनेकांचे घरे, अनेकांचे संसार या कोरोनाने उद्धवस्त झाले आहेत आणि हे डोळ्याने पाहूनही नागरिक प्रतिसाद देत नाहीत, व्यापारी वर्ग आपल्या निर्णयावर ठाम आहेत, अर्थात त्यांचीही परिस्थिती तसेच आहे, दररोज त्यांचा व्यवसाय चालू असले तरच त्यांच्या कुटुंबाचा त्यांच्या सोबत कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कुटुंबाचा इतर खर्च त्यांना जमवता येईल अन्यथा फार मोठया भीषण परिस्थितीला तोंड द्यावे लागेल हे पण तेवढेच सत्य आहे.
पण प्रश्न असा निर्माण होत आहे की, फक्त शनिवार,रविवार कर्फु किंवा अत्यावश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद ठेवल्याने कोरोना जाईल का? नक्कीच जाणार नाही परंतु शासनाने जे नवीन प्रयोग करण्याचा ठरवलं आहे ते म्हणजे “ब्रेक द चैन” याला थोडं फार यश नक्की मिळेल. परंतु यासाठीही नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
राज्यातील अनेक जिल्हे लॉकडाऊन परिस्थितीत आहेत आणि याला आपण पण थोडे फार जबाबदार आहोत हे विसरून चालणार नाही, भले हा रोग केंद्र सरकारने असो वा राज्य सरकारने आणले नाही परंतु महारोग वाढीला कारण आपण पण आहोत हे लक्षात असू द्या..!
विनाकारण रस्त्यावर फिरणे, तोंडावर मास्क वापरायचं नाही, निष्काळजीपणा वावर, शेताला चाललो,मेडिकलला आलोय, किराणा घेतोय,भाजीपाला घेतोय, पाणी आणतो असे अनेक विविध कारणे सांगत रस्त्यावर फिरणे मात्र बंद झाले नाही.
एकेकाळी मासिक किराणा भरणारे, आठवडी बाजार करणारे पण आता दररोज हातात पिशव्या घेऊन फिरताना दिसतात, त्यांना कोरोना म्हणजे एक नवीन खेळ झालं आहे, “ज्यांना कोरोना झालं त्यांना कोरोना कळलं, पण “ज्यांना नाही झालं त्यांनी त्याला खेळ समजलं..!”
आपल्या बरोबर आपल्या परिवाराला,आपल्या समाजाला नकळत आपण कोरोनाच्या खाईत ढकलत आहोत आणि याच भान आपल्याला राहिलेला नाही, सरकार कोरोनाची साखळी तोडण्यास प्रयत्नशील आहे तर आपण मात्र साखळी वाढवण्यास कारण ठरत आहोत, आणि यात सरकारचा ही समावेश आहे.
शासन पुढाकार घेऊन लसीकरणास आवाहन करत आहे, आदी ६० वर्षा पुढील आता ४५ वर्षापुढील सर्व नागरिकांना लस देणे चालू आहे परंतु त्यालाही ग्रामीण भागातून म्हणावे तेवढे प्रतिसाद येत नसल्याचे दिसून येते. व्यापारी वर्गाला रॅपिड टेस्ट करायला सांगीतल तर त्याला ही ते टाळा टाळ करतात, नागरिकांना विनाकारण बाहेर फिरू नका म्हणलं ते बाहेर फिरतात, गर्दीत जाणे टाळा,मास्क वापरा म्हंटल की त्याच्या विरोध कृती करतात मग आता सांगा सरकारने नक्की काय करावे असे तुम्हाला वाटत…?
वैधकीय प्रशासन, नगर प्रशासन असो, पोलीस प्रशासन असो आपल्या स्तरावरून जीवाची बाजी लावून कार्य करीत आहेत, एक एक जीव वाचवण्यासाठी सरकार झटत आहे आणि आपण काय करत आहोत..? ज्यावेळी एकाच गोष्टीवर संघर्ष चालू असते तेंव्हा सर्वांनी एकत्र येऊन त्याला लढा देयाचा असतो तेंव्हा तो संघर्ष फळ देणारा ठरतो अन्यथा ते प्रयत्न नीस्फळ ठरतात.
गतवर्षी अनेक कोरोना योद्धानी महामारीस सामोरे जात त्या वेळेला विजय मिळवून दिला मग त्यात पत्रकार बांधव होते, समाजसेवी संस्था होते, सामाजिक कार्यकर्ते होते, आशा वर्कर्स होते असे विविध क्षेत्रातील व्यक्तींनी संघर्षाला साथ दिली परंतु यावर्षी मात्र हे योद्धा पुढे येताना दिसत नाहीत यावरही चिंतन होणे गरजेचे आहे. कसल्याही फळाची अपेक्षा न करता समाजासाठी लढणाऱ्या या योद्धाच शासनाने काय दखल घेतली? हे ही प्रश्न निर्माण होतो, अनेक योद्धानी समाजसेवीनी महामारीत जीवाची बाजी लावून कार्य केले परंतु शासन स्तरावरून मात्र ना त्यांची स्तुती झाली नाही त्यांचा गौरव झाला यावरही विचार करणे गरजेचे आहे.
सद्याची महामारीत सर्वांनी एकत्र मिळून लढा जारी ठेवणे गरजेचे आहे अन्यथा या महामारीच्या भस्मासुरास हरवणे कठीण आहे. सद्याची परिस्थितीवर राजकारण न करता सर्वपक्षीय, सर्व धर्मीय, सर्व नागरिकांनी एकत्र येऊन संघर्ष करणे गरजेचे आहे तरच या महाभयंकर रोगावर विजय मिळवता येईल अन्यथा कोरोनाचे जखम औषध येई पर्यंत कायम ओले राहील हे लक्षात राहू द्या.प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य दिल आहे परंतु त्या व्यक्तिस्वातंत्र्याचा राजकारण न करता समाजासाठी ते उपयोगात कसे आणता येईल हेही तितकेच महत्वाचे आहे….
बाकी कोरोनावर राजकारण करू नका एवढीच एक विनंती, थांबतो..,
– क्रमशः
Leave A Comment