दत्तात्र्य कारभारी यांचे निधन

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

दत्तात्र्य कारभारी यांचे निधन


मुरुम, ता. १० (प्रतिनिधी) : कलदेव लिंबाळा, ता.उमरगा येथील दत्तात्र्य परमेश्वर कारभारी यांचे लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सोमवारी (ता.१०) रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुःखद निधन झाले. हे ६३ वर्षाचे होते. निधनाची बातमी कळताच गावात शोककळा पसरली. ते मुरूमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक होते. गावातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक, गेल्या १५ वर्षापासून ग्रामपंचायतीचे सदस्य तर पाच वर्ष उपसरपंच म्हणून कार्य केले. गेल्या ३० वर्षापासून काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ व जेष्ठ कार्यकर्ते होते. त्यांच्यावरती त्यांच्या शेतात रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात्य पत्नी, दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. भोसगा, ता.लोहारा येथील
ग्रामविकास अधिकारी संजय कारभारी यांचे ते वडील होत.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment