मुरुम ः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुरुम पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पंधरा गावात सार्वजनिक गणेश उत्सव साजरा न करण्याचा निर्णय या गावातील गणेश मंडळ व पोलीस प्रशासन यांनी घेतला आहे. त्यामुळे या पंधरा गावात यंदा सार्वजनिक ठिकाणी गणेश मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली नाही.तर अकरा गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली आहे अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.गणेश उत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली पुढील दहा दिवस हा उत्सव सुरु राहणार आहे.यंदाच्या गणेश उत्सवावर कोरोनाचे संकट असल्याने उत्सवावर मर्यादा आल्या आहेत.उत्सवा दरम्यान गणेश मुर्तीच्या ठिकाणी गर्दी करता येणार नाही ,भाविकांना दर्शन ही घेता येणार नाहीत शिवाय मिरवणुका ही निघतील की नाही याची शाश्वती नाही.त्यामुळे अनेक गावातील गणेश मंडळानी यंदा गणेश उत्सवाचे कार्यक्रम रद्द केले सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.घरीच उत्सव साजरा करण्याचा निर्णय गणेश भक्तांनी घेतला आहे.त्यामुळे मुरुम पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पंधरा गावात सार्वजनिक ठिकाणी गणेश मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली नाही.गणेश मुर्तीची स्थापना न झालेल्या गावांची नावे पुढील प्रमाणे आलूर ,अचलेर, बेळंब,केसरजवळगा,कोथळी,कलदेव निंबाळा, कोराळ काळनिंबाळ, नळवाडी,या मोठ्या गावासह अंबरनगर, गणेशनगर,कोराळ,इंगोले तांडा,आचारी तांडा, शिवाजीनगर तांडा या गावांचा समावेश आहे तर अकरा गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली असून त्यात येणेगुर ,भुसणी ,वरनाळवाडी ,महालिंगरायवाडी ,कडदोरा, सुपतगाव, दस्तापुर,कंटेकुर ,नाईकनगर ,कोळणुर पांढरी शास्त्रीनगर तांडा,या गावात एक गाव एक गणपती बसविण्यात आली आहे.
आष्टाकासार व भुयार चिंचोली येथे प्रत्येकी दोन तर दाळिंब मध्ये ठिकाणी मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे.मुरुम शहरात अकरा ठिकाणी सार्वजनिक गणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे.यात शहरातील मानाचे किसानचौक,अशोक चौक,सुभाष चौक,गांधी चौक हनुमान चौक,सोनार गल्ली ,महादेव नगर, शास्त्रीनगर, संभाजीनगर,बाजार रस्ता महादेव नगर,आदी गणेश मंडळांनी सार्वजनिक ठिकाणी गणेश मुर्तीची प्रतिष्ठापणा केली आहे.यासंदर्भात मुरुम पोलीस ठाण्याचे सपोनि यशवंत बारवकर यांनी म्हणाले मुरुम पोलीस ठाण्याअंतर्गत २९ गावे असून त्यापैकी पंधरा गावातील नागरीक व गणेश मंडळाच्या पदाधिका-यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गणेश मुर्तीची स्थापना केली नाही तर अकरा गावात एक गाव एक गणपती ही मोहीम राबविण्यात आली आहे.मुरुम शहरात अकरा ठिकाणी सार्वजनिक मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. आष्टाकासार व चिंचोली भुयार येथे प्रत्येकी दोन व दाळिंबमध्ये तीन ठिकाणी प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली आहे.ज्या पंधरा गावांनी यंदा सार्वजनिक गणेश उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.या गावांचा गौरव जिल्हापोलीस अधिकक्षक यांच्या हस्ते करुन त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल तसा प्रस्ताव आम्ही जिल्हा पोलीसअधिक्षक यांच्याकडे लवकरच पाठवणार आहोत.गणेश भक्तांनी मुर्तीच्या ठिकाणी गर्दी करु नये,फिजिकल डिस्टन्सिंग ठेवावे,मास्कचा वापर करावा,गणेश मंडळांनी समाज उपयोगी उपक्रम राबवावेत असे आवाहन केले.
Leave A Comment