लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग मुरूमला जोडण्याची मागणी, रेल्वे कृती समितीच्या बैठकीत चर्चा
लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू आहे या सर्वेक्षणात रेल्वे मार्ग उमरगा ते मुरूम मार्गे गुलबर्गा जोडण्यात यावी अशी मागणी मुरूम व परिसरातील नागरिकतुन करण्यात येत आहे विशेष म्हणजे या मागणीसाठी मुरूम परिसरातील विविध राजकिय पक्ष,सामाजिक संघटना, व्यापारी संघ , तसेच शेतकऱ्यांनी एकत्र बैठक घेवून चर्चा घडवली आहे.
मुरूम येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला सभागृहात किसान कांग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अड़. राजासाहेब पाटिल यांच्या नेतृत्वखाली मुरूम परिसर रेल्वे कृती समितीची बैठक घेण्यात आली.यावेळी प्रमोद कुलकर्णी, चंद्रशेखर मुदकण्णा, गुलाब डोंगरे,अशोक मिनियार,निसार मदारसे, उदय वैद्य,सयाजी शिंदे, सलीम अत्तार,दिलीप इंगोले,उमाकांत मंगरुळे,सरपंच शमशोद्दीन जमादार,राजकुमार माने,सिद्धेश्वर पाटील,सरपंच सुनील मुळे यांच्यासह शहर व कोथळी, आलूर,वरणाळ,तुगाव,सुंदरवाडी,आष्टाकासार,भुसणी,कंटेकुर आदी गावातील सरपंच,राजकीय व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आयोजित बैठकीत किसान काँग्रेसचे प्रदेश मराठवाडा उपाध्यक्ष राजासाहेब पाटील यांनी सदरील विषयावर सविस्तार मार्गदर्शन केले
लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग निलंगा ते उमरगा-आळंद गुलबर्गा असे असणार आहे त्यामुळे या मार्गावरील रेल्वे मुरूम परिसराला जोडल्यास रेल्वेसाठी कश्याबाजूने योग्य व फायद्याचे राहील यावर अनेकांनी मत व्यक्त केले. सदरील मार्ग मुरूम परिसराला जोडल्यास सर्वच स्तरातील नागरिकांचे विकास होईल आणि नवीन उद्योगांना चालना मिळू शकते त्यामुळे सर्वेक्षणात मुरूम परिसराचा विचार व्हावा यासाठी कृती समितीच्यावतीने वरिष्ठ स्तरावर मागणी करण्यात येणार आहे विशेष म्हणजे मागण्या मान्य होईपर्यन्त आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येणार आहे अशी चर्चा करण्यात आली
यावेळी सयाजी शिंदे,रवींद्र शिदोरे, प्रा रेणके, दस्तापुर उपसरपंच डावरे, अजित चौधरी,मोहन जाधव आदींनी आपले मत व्यक्त केले. बैठकीत चर्चा व कोअर कमिटीची प्राथमिक स्थापना करण्यात आली असून १७ व्यक्तींचे कोअर कमिटी मध्ये निवड करण्यात आले आहे बैटकीचे सूत्रसंचालन आनंद कांबळे यानी केले तर आभार भगत माळी यानी मानले
प्रतिक्रिया
लातूर ते गुलबर्गा रेल्वे मार्ग निलंगा मार्गे उमरगाहुन जोडला जाणार आहे त्यामुळे उमरगापासून मुरूम मार्गे गुलबर्गा रेल्वे मार्ग जोडण्यात यावी उमरगा,मुरूम,आळंद असे मार्ग निवडल्यास रेल्वेसाठी फायद्याचे व योग्य राहणार आहे त्यामुळे सर्वेक्षणात याबद्दल विचार व्हावा, यासाठी मुरूम परिसर रेल्वे कृती समितीची मागणी आहे.भविष्यात यासाठी आंदोलन करण्यात येतील– राजासाहेब पाटील,माजी सभापती,पंचायत समिती,उमरगा
मुरूम व परिसरात रेल्वे मार्ग जोडल्यास रेल्वे विभागासाठी आहेच शिवाय मुरूम परिसरातील नागरिकांसाठी फायद्याचे राहील या परिसरातील नागरिकांनी केलेली मागणी अतिशय योग्य आहे- Ad उदय वैद्य,मुरूम
Leave A Comment