लोककल्याण प्रतिष्ठान कडून निराधारांना ब्लॅंकेट चे वाटप.
कोराळ – दि. 29 रोजी उमरगा तालुक्यातील कोराळ येथील लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने युवानेते किरणजी भैय्या गायकवाड व युवानेते किरणजी दादा दासमे यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त लोककल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष विक्रम दासमे यांच्या संकल्पनेतून गावातील जेष्ठ नागरिक व निराधारांना ब्लॅंकेट तसेच आयुर्वेदिक सर्दी खोकला औषधाचे वाटप करण्यात आले.
दिवसेंदिवस वाढत्या थंडीचे गांभिर्य लक्षात घेऊन गोरगरीब, निराधार व जेष्ठ नागरिकांना थंडी पासून संरक्षण मिळावे त्यांना मायेची ऊब मिळावी व तसेच सर्दी खोकला वाढत आहे तो रोखण्यासाठी औषधाचे वाटप करण्यात आले.त्यावेळी किरणजी दासमे,लोककल्याण चे सचिव रवि दासमे,विद्यासागर सुरवसे,बंटु पाटील,दिलीप सुरवसे,लोककल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष विक्रम दासमे,बालाजी शिंदे,विष्णु साळुंखे,विनोद सुरवसे,जयपाल गायकवाड,शिवहारी कांबळे,बाबु पवार,संजु माने,विद्यासागर गायकवाड तसेच विविध उपक्रमांने वाढदिवस साजरा करण्यात आला समस्त लोककल्याण प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी सदस्य व गावातील नागरिक,युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave A Comment