लोककल्याण प्रतिष्ठान कडुन निवासी अंपग मुलांना दिवाळी फराळ वाटप
उमरगा तालुक्यातील सास्तुर येथील दिनांक ८ रोजी निवासी अंपग,अनाथ शाळेतील विद्यार्थ्यांना कोराळ येथील लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दिवाळी निमित्त फराळ व आकाश कंदिलाचे वाटप करण्यात आले. कंदीलातील दिव्याप्रमाणे अंपग,अनाथ मुलांना नवचैतन्य व त्यांच्या जिवनात अंधकार दूर होऊन त्यांचे जिवन प्रकाशमय होऊन इतरांप्रमाणे त्यांनीही दिवाळी सण साजरा करून आनंद घ्यावा असा संकल्प ठेवून लोककल्याण प्रतिष्ठान नेहमी ” चला जगुया जगावेगळे ” या उक्तीप्रमाणे नेहमी असेच आगळेवेगळे कार्यक्रम घेत असताना पहावयास मिळते. सेवाभाव वृत्ती जोपासत या संस्थेने अनेक कार्यक्रम राबविले आहेत. भविष्यातही विविध उपक्रम राबविण्याचा या संस्थेचा मानस आहे. या फराळ वाटप उपक्रमासाठी कोराळ शिवसेनेचे किरण दासमे,संस्थेचे सचिव रवि दासमे,संभाजी सुरवसे,आप्पाराव जाधव,बालाजी शिंदे, बालाजी इगवे,संस्थेचे अध्यक्ष विक्रम अशोकराव दासमे,सिध्दांत मस्के, रविंद्र चव्हाण आदी लोककल्याण प्रतिष्ठान चे सदस्य पदाधिकारी तर शाळेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे,शिक्षीका चलवाड अंजली,प्रयागताई पवळे,दगडु सगर,शंकरबावा गिरी,किरण मैंदर्गे,सुरेखा परीट आदी शिक्षक व कर्मचारी आणि शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
Leave A Comment