जनहित सामाजिक संस्था, आलूर तर्फे गरीब-गरजू कुटुंबाना दिवाळी साहित्य वाटप

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

जनहित सामाजिक संस्था, आलूर तर्फे गरीब-गरजू कुटुंबाना दिवाळी साहित्य वाटप

दि. 12 नोव्हेंबर रोजी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आलूर(ता.उमरगा) येथे जनहित सामाजिक संस्था, आलूर यांच्याकडून गोर-गरिबांना दिवाळी निमित्त लागणाऱ्या गोड पदार्थ, फराळ साहित्य व इतर साहित्यांचा वाटप करण्यात आले.
याबद्दल संस्थेचे प्रवक्ते आनंद देशट्टे यांनी अशी माहिती दिली की, जनहित सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी सामाजिक उपक्रमाअंतर्गत निबंध स्पर्धा, गणेशोत्सव व रमजान निमित्त थंड पाणी, व्यसन मुक्ती संदेश, 10 वी-12वी नंतर काय ? -व्याख्यान असे विविध समाज-उपयोगी उपक्रम राबविले जातात. दिवाळी सणाचे औचित्य साधून गरजू-गरीब कुटुंबाना लागणाऱ्या सर्व वस्तूंचा समावेश करून त्यांना देण्यात आले.
यावस्तूमध्ये उटणे, साखर, चुरमुरेपाकिट, तेल, साबण, रवा, गुळ, शेंगदाणे, नारळ, मसाला आदी 27 वस्तुसह आकाशकंदीलचा समावेश करण्यात आल्याचे संस्थेचे खजीनदार श्री.परवेज सौदागर यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात या संस्थेतर्फे ११ सदस्यीय समिती गटीत करुन सर्वे करण्यात आले होते आणि त्या सर्वेनुसार आलूर गावातील 25 गरीब-गरजू व ज्या कुटूंबाला आधार नाही अश्या कुटुंबाची निवड करण्यात आले. यामध्ये सर्व समाजातील लोकांचा सामावेश असल्याचे मत संस्थेचे सहसचिव हणमंतप्पा शंके यांनी सांगितले.

“हाक तुमची-साथ आमची” संस्थेच्या ब्रीद वाक्यप्रमाणे यापुढेही जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा मानून संस्था काम करीत राहील असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष ॲड.शिवराज कुंचगे यांनी केले.
भिमनगर, इंदिरानगर, ज्योती लमाण तांडा, वीर ककय्या नगर, वडार गल्लीसह गावातील अनेक परिवारांचा समावेश असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख संजय कासार यांनी दिली.
हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी महेश गुरव, शरणप्पा काशेट्टे, आनंद देशेट्टे, इरण्णा मातोळे, बसवराज पांढरे , संजय कासार, परवेज सौदागर आदींनी मेहनत घेतले. या सामाजिक उपक्रमाबद्दल आलूर पंचक्रोशीत जनहीत संस्थेचे कौतुक केले जात आहे.

 

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment