बालाजी गणेश मंडळ येथे बापूराव पाटील तर्फे अन्नधान्य किट वाटप…

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

बालाजी गणेश मंडळ येथे बापूराव पाटील तर्फे अन्नधान्य किट वाटप…

मुरूम ता.१६, येथील सोबाजी गल्लीतील बालाजी गणेश मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी सामाजिक उपक्रम राबवत आहेत, दि.१५ रोजी रात्री कीर्तन व भारुडाचे मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते आज दि.१६ रोजी सायंकाळची श्री ची आरथी उस्मानाबाद जिल्हा परिषद विरोधीपक्षनेते शरण बसवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी प्रमोद आबा कुलकर्णी, उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बबन बनसोडे, काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष सुधार चव्हाण,राम डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी बालाजी गणेश मंडळाच्या वतीने आयोजित बापूराव पाटील यांच्या तर्फे गोर-गरीब नागरिकांना अन्नधान्याचे १०१ किटचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. प्राथमिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते ११ किटचे वाटप करून उर्वरित किटचे मंडळाच्या पदादीधिकाऱ्यांचे हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी शरण पाटील,प्रमोद आबा कुलकर्णी, राम डोंगरे आदीने आपले मनोगत व्यक्त करत मंडळाच्या सामाजिक उपक्रमाचे स्तुती केले व मंडळाच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी बालाजी गणेश मंडळाचे अध्यक्ष. गोविंद सोबाजी उपाध्यक्ष सागर शिंदे,सचिव किरण सोबाजी. सदस्य – सुभाष सोबाजी ,सुरेश सोबाजी ,पवन मिनियार . अंकुश कौलकर गोपाळ सोबाजी , जितेंद्र सोबाजी.विनोद पोतदार. ,राजकुमार वाले ,श्रीकांत शिंदे , हरी सोबाजी , संदीप बाबळसुरे. प्रविण बिराजदार .सागर पोतदार. आकाश सोबाजी . ,व मंडळाचे सर्व पदाधिकारी ,सदस्य व शेकडो गणेश भक्त उपस्थित होते ..

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment