गुंजोटी येथे दिव्यांगाना वैश्विक ओळखपत्राचे वाटप

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

गुंजोटी येथे दिव्यांगाना वैश्विक ओळखपत्राचे वाटप

मुरूम, ता. ५ (प्रतिनिधी) :
उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे पंचायत समिती सदस्य सौ. क्रांतीताई व्हटकर यांच्या संपर्क कार्यालयात गुंजोटी पंचायत समिती गणातील गुंजोटी, गुंजोटीवाडी व औराद येथील दिव्यांग व्यक्तींना समाजकल्याण विभागाच्या वतीने शनिवारी (ता.५) रोजी युवानेते किरण गायकवाड यांच्या हस्ते दिव्यांग वैश्विक ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य टी. एस. पवार होते. समर्पण सामाजिक सेवाभावी संस्थेचे किशोर व्हटकर, निवासी मूकबधिर विद्यालयाचे विशेष शिक्षक प्रदीप लिंबाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य दशरथ देवकते, माजी सैनिक खंडू दूधभाते, अनिल जगताप, राजू जाधव, नंदकिशोर खमीतकर, युवासेना सचिव उस्मान सय्यद, जुबेर काझी, आकाश शिंदे, विक्रम व्हटकर, दत्ता कटकधोंड, तानाजी मळगे, मनोज जाधव आदींची उपस्थिती होती. यावेळी विशेष शिक्षक प्रदीप लिंबाळे यांनी दिव्यांग व्यक्तींना असलेल्या विविध शासकीय योजनांची महिती दिली. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग वैश्विक ओळखपत्राचे महत्व विशद केले. दिव्यांग व्यक्तींना असलेल्या सवलती सांगून तो त्यांचा हक्क असल्याचे नमूद केले. दशरथ देवकते यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमासाठी दिव्यांग व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment