कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडून विविध उपाययोजना राबविण्याचे आदेश

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडून विविध उपाययोजना राबविण्याचे आदेश

उस्मानाबाद,दि.27:-महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम, 2020” प्रसिद्ध केले असून यातील नियम क्र. 3 नुसार करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोविड-19 च्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असून कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी कोरोना विषाणु (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आरोग्य विभागाच्या निकषांनुसार करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबरच खालीलप्रमाणे उपाययोजना करणेबाबत आदेशित केले आहे.
1.जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद यांनी Critical Patients Monitoring बाबत आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या कार्यपद्धती (SOP) ची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास सादर करावी. तसेच या कार्यपद्धतीनुसार Critical
Patients ना जे उपचार देणे आवश्यक आहे. त्यानुसार DCH मध्ये आवश्यक उपचार देण्याची कार्यवाही करावी.
2. सर्व CCC, DCH, DCHC, PHC, SDH, फिरते तपासणी केंद्र या ठिकाणी थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सीमिटरद्वारे तपासणी करुन त्याबाबतच्या नोंदी ठेवण्यात याव्यात व यातील आरोग्यविषयक निकषांनुसार संशयित व्यक्तींबाबत पुढील उपचाराची कार्यवाही करण्यात यावी.
3. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांनी नागरी भागात व जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. यांनी ग्रामीण भागामध्ये रुग्णांचा सिरो सर्व्ह करावा व त्याचा दैनंदिन अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे सादर करावा.
4. कोविड-19 चा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची शोध मोहिम (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग)आरोग्य विभागाच्या निकषांनुसार प्रभावीपणे राबविण्यात यावी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना कोविड-19 चा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात ज्येष्ठ नागरिक,दुर्धर आजारग्रसत व्यक्ती,लहान मुले आली आहेत काय याकडे विशेष लक्ष देण्यात यावे व त्यांचेवर आवश्यक असलेले उपचार तात्काळ करण्यात यावेत.
5. कन्टेन्मेंन्ट झोनमध्ये नागरिकांची थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सीमिटरद्वारे तपासणी करुन त्याबाबतच्या नोंदी ठेवण्यात याव्यात. तसेच कन्टेन्मेंट झोनमध्ये Rapid Antigen Test द्वारे तपासणी करण्यात यावी. यातील संशयित व्यक्तींबाबत आरोग्यविषयक निकषांनुसार पुढील उपचाराची कार्यवाही करण्यात यावी.
6. Rapid Antigen Test ची संख्या वाढविण्यात यावी. तसेच Rapid Antigen Test करण्यापूर्वी थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सीमिटरद्वारे तपासणी करुन त्याबाबतच्या नोंदी ठेवण्यात याव्यात.यातील संशयित व्यक्तींबाबत आरोग्यविषयक निकषांनुसार पुढील उपचाराची कार्यवाही करण्यात यावी.
7. थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सीमिटरद्वारे केलेल्या तपासणीतील नोंदीवरुन संशयित वाटत असलेल्या Asymptomatic व्यक्तींच्या बाबतीत तात्काळ X-ray द्वारे तपासणी करुन आवश्यक उपचार करण्यात यावेत.
8. कोविड-19 चा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील अतिजोखमीतील (हाय रिस्क) व कमी जोखीम (लो रिस्क) व्यक्तींची थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सीमिटरद्वारे तपासणी करुन त्याच्या नोंदी ठेवण्यात याव्यात. तसेच Rapid Antigen Test करण्यात याव्यात व Symptomatic रुग्णांची तात्काळ RTPCR टेस्ट करुन आरोग्य विभागाच्या निकषांनुसार
उपचार चालू करण्यात यावेत. तसेच Asymptomatic रुग्णांच्या बाबतीतही आरोग्य विभागाच्या निकषांनुसार आवश्यक उपचार तात्काळ सुरु करण्यात यावेत.
9. सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, बँका, सहकारी, खाजगी संस्था यांनी आरोग्य विभागाकडून थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सीमिटरद्वारे करावयाच्या तपासणीबाबतची माहिती घेऊन थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सीमिटरद्वारे अधिकारी, कर्मचारी व येणा-या अभ्यागतांची दररोज नियमित तपासणी करावी व त्याबाबतच्या नोंदी ठेवण्यात याव्यात. तसेच या तपासणीमध्ये आढळून आलेल्या संशयित व्यक्तींना तात्काळ वैद्यकीय उपचार घेणेबाबत सूचित करावे.
10. विभाग नियंत्रक रा. प. उस्मानाबाद यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. उस्मानाबाद यांचेकडून आवश्यक तेवढे थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सीमिटर उपलब्ध करुन घ्यावेत. तसेच याद्वारे करावयाच्या तपासणीबाबतची माहिती घ्यावी. जिल्ह्यातील सर्व बस स्थानकांवर एक आगमन (एन्ट्री पॉईंट) व निर्गमन (एक्झिट पॉइंट) ठिकाण निश्चित करावे व त्याठिकाणी येणा-या व जाणा-या प्रवाशांची थर्मलन स्कॅनर व पल्स ऑक्सीमिटरद्वारे तपासणी करुन त्याबाबतच्या नोंदी ठेवण्यातद याव्यात. यासाठी आगमन व निर्गमन ठिकाणी पुरेसे कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत. या तपासणीमध्ये आढळून आलेल्या संशयित प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय उपचार घेणेबाबत सूचित करावे.
11.जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या वॉर रुमप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक वॉर रुम स्थापन करणेबाबत व त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करणेबाबत जिल्हा आयुष अधिकारी यांनी कार्यवाही करावी. वॉर रुम स्थापन केल्याबाबत तसेच त्याठिकाणी उपलब्ध करुन दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकाची जाहीर प्रसिध्दी करण्यात यावी.या ठिकाणी नागरिकांना त्यांच्या अडचणी,शंकांबाबत मार्गदर्शन करण्यात यावे.तसेच नागरिकांच्या तक्रारींची नोंद करुन त्यांचे निराकरण करण्यात यावे.
वरिल नमूद सूचनांनुसार सर्व संबंधित शासकीय विभागानी तात्काळ आवश्यक कार्यवाही करावी. तसेच नियुक्त केलेले समन्वय अधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या कामकाजाशी संबंधित वरिल नमूद मुद्द्यांचे अनुषंगाने कार्यवाही होत असल्याबाबत समन्वय व पर्यवेक्षण करावे.
तसेच सर्व जिल्हास्तरीय शासकीय विभागांचे प्रमुखांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या सर्व कार्यालयांना या आदेशातील त्यांचेशी संबंधित असलेल्या मुद्द्यांनुसार आवश्यक कार्यवाही करणेच्या सूचना द्याव्यात.
या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहेत.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment