डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्री वीरशैव जंगम मठाच्या वतीने श्रद्धांजली…

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना श्री वीरशैव जंगम मठाच्या वतीने श्रद्धांजली…

तुळजापूर ता.०४, वसुंधरारत्न,राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे मंगळवारी(दि.१) नांदेड येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले आहे. तुळजापूर येथे श्री वीरशैव जंगम मठाच्या वतीने सामाजिक अंतराचे पालन करीत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी वयाच्या १०४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे, विज्ञान व अध्यात्माची सांगड घालणारे, अंधश्रद्धेपासून समाजाला मुक्त करणारे, राष्ट्राभिमान शिकविणारे, स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठवाडयातील पहिले एम.बी.बी.एस.डॉक्टर वयाच्या १०४ व्या वर्षापर्यंत समाजप्रबोधन केले.लिंगायत स्वतंत्र धर्म आंदोलनाच नेतृत्व करत महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या निधनाने आध्यत्मिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांना श्री वीरशैव जंगम मठ तुळजापूर यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात अली.याप्रसंगी अभिषेक कोरे,गुरुनाथ बडुरे,लक्ष्मण उळेकर,राहुल साखरे व समाजबांधव उपस्थित होते.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment