डॉ.विठ्ठलराव जाधव यांची राज्यपालांशी भेट-सामाजीक व युवकांच्या प्रश्नाविषयी केली चर्चा

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

डॉ.विठ्ठलराव जाधव यांची राज्यपालांशी भेट
————————


सामाजीक व युवकांच्या प्रश्नाविषयी केली चर्चा
————————–

उमरगा :
महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.विठ्ठलराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीदुत परिवारच्या शिष्टमंडळाने राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन रविवारी (ता.१५) रोजी राजभवन येथे भेट घेतली. यावेळी सामाजीक कार्याविषयी सखोल चर्चा झाली. राज्यपालांनी शिष्टमंडाळातील प्रत्येक सदस्यांना वयक्तिक चर्चा करून सामाजीक कार्याविषयी माहीती घेतली.
शांतीदुत परिवारच्या वतीने महाराष्ट्र राज्यासह देशातील विदेशातील अनेक ठिकाणी चालविण्यात येणाऱ्या रक्तदान, वृक्षारोपण, गरजुंना मदत, युवक व शेतकऱ्यांना मार्गदर्शन आदी उपक्रमाची राज्यपालांनी कौतुक केले. यावेळी राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.विठ्ठलराव जाधव व शांतीदुत परिवारच्या संस्थापक अध्यक्षा सौ. विद्याताई जाधव यांच्याहस्ते स्मृतीचिन्ह देऊन राज्यपालांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बडवे इंजिनिअरींग प्रा. लि.चे संचालीका तथा शांतीदुत परिवारच्या उपाध्यक्षा सौ. सुप्रीया बडवे यांची महीला उद्योजक विकास परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याने व त्यांच्या सामाजीक कार्यातील योगदानाबद्दल राज्यपालांनी सत्कार केला.. यावेळी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. तृशाली जाधव यांनी अॅक्युमन या नविन शिक्षणपध्दतीविषयी राज्यपालांना शैक्षणीक संच भेट देऊन चर्चा केली. यावेळी मायक्रोकॉमचे संचालक तथा शांतीदुत युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रा. युसुफ मुल्ला यांनी राज्यपालांना ‘विठ्ठल झालाशी कळस’ हे पुस्तक भेट दिले.
डॉ. जाधव यांनी कारागृहातील कैद्यांना मुळ प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. डॉ. जाधव यांना त्यांच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल राष्ट्रपती पुरस्कार मिळाले आहे. त्यांच्या सध्या सर्वत्र करत असलेल्या सामाजीक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे..
————

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment