माल खाये मदारी, नाच करे बंदर…फुलसिंगनगर तांडा रस्ता मंजूर, कामासही होईल सुरुवात…!

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

माल खाये मदारी, नाच करे बंदर…

फुलसिंगनगर तांडा रस्ता मंजूर, कामासही होईल सुरुवात…!

वास्तव सत्य..

मुरूम परिसरातील रस्त्यासाठी ३५ वेळा प्रशासनास पाठपुरावा तर विविध प्रसार माध्यमात ४१ वेळा बातमी
फुलसिंगनगर तांड्याला गेल्या ७० वर्षा पासून रस्ता नाही, नागरिकांचे होणारे हाल,त्रास याची दखल घेत बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी आंदोलनाचे रणसिंग फुंकले.
ऑक्टोबर २०१७ ला चालू झालेले पाठपुरावा १९ जुलै २०१९ रोजी प्रशासकीय निधी मंजुरी मिळाली आणि सर्वात मोठा यशस्वी आंदोलन घडले, मुरूम परिसरातील रस्तासाठी केलेलं पाठपुरावा त्यात फुलसिंगनगर तांडा,आलूर-केसर जवळगा,भुसणी वाडी-मुरूम,येणेगुर जेवळी,भुयार चिंचोली-नाईकनगर या रस्त्याचा समावेश आहे. वरील पाच रस्त्या पैकी जानेवारी २०२० मध्ये भुसणी वाडी-मुरूम,येणेगुर-जेवळी,आलूर -केसर जवळगा (थोडा) रस्ता काम झाले, फुलसिंगनगर तांडा रस्त्याचा चुकीच्या ई टेंडर मुळे, परत टेंडर भरण्यात आले यात कालावधी गेले, पुढील प्रशासकीय कामकाजात गेलेलं वेळ, त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये काही रस्त्याचे कामे झाले आणि फेब्रुवारी पासून संपूर्ण जगावर आणि देशावर कोरोनाच्या आपत्तीत सर्व कामे ठपली आणि आता पावसाळ्यात रस्ता करणे योग्य नाही त्यामुळे दिरंगाई…
—————————————-
फुलसिंगनगर (पाटील तांडा) रस्ता पाठवपुरावा
प्रशासकीय पाठपुरावा-
16.10.2017 पासून पाठपुरावा चालु..
25 जानेवारी 2018,21 फेब 2018,12 मार्च 2018,19 मार्च 2018,19 मार्च 2018,27 मार्च 2018,02 एप्रिल 2018-3 पत्र,08 मे 2018-2 पत्र, 09 मे 2018,22 मे 2018,28 मे 2018,21 जुलै 2018,23 जानेवारी 2019,31 मे 2019,19 जुलै 2019 निधी मंजूर, 19 जानेवारी 2020 पहिला रस्ता कामास सुरुवात, हे झाले प्रशासन पाठपुरावा
————————————
विविध वर्तमानपत्र मध्ये बातमी 26 जानेवारी 2018- लोकसत्ता मराठवाडा पान, सकाळ,दिव्यमराठी, 20 जानेवारी 2018 ते 23 जाने-लोकांना स्वतःच्या हक्कासाठी एकत्र करणे, 09 जानेवारी 2018-युवा छत्रपती,08 जाने 2018-लोकमत,07 जाने 2018-सामना/तरुण भारत,06 जाने 2018-यशवंत,28 फेब्रुवारी 2018-संचार,25 फेब 2018-पुण्यनगरी,14 फेब 2018 कक्ष अधिकारी पत्र,30 मे 2018 कार्यकारी अभियंता पत्र, 29 मे 2018 अधिकारी भेट,27 मे 2018- संचार, 25 मे 2018 सामना,25 मे 2018-जनमत,21 मे 2018 मुख्यमंत्री यांना पत्र, 23 जून 2018- पुण्यनगरी,30 जुलै 2018-संचार,29 जुलै 2018 गावकरी,27 जुलै 2018-आंदोलन, 26 जुलै 2018-पुण्यनगरी, दिव्यमराठी,25 जुलै 2018 लातूर समाचार,लोकमत,समय सारथी,यशवंत,14 सप्टेंबर 2018 दिव्यमराठी,11 सप्टेंबर 2018 जि.प.पत्र,18 जाने 2019 पुण्यनगरी,17 जानेवारी 2019 जनमत,16 जाने 2019 माझी बातमी,22 फेब 2019 ठराव प्रत,26 फेब 2018, पुण्यनगरी, 19 जानेवारी 2020 मुरूम-भुसणी वाडी रस्ता कामास सुरुवात.

—————————————-
माल खाये मदारी,नाच करे बंदर

अशी सद्याची परिस्थिती झाली आहे, समाजसेवकाच्या कामाला काहीही अर्थ उरले नाही असे दिसून येते, परिस्थितीची वास्तव्य सत्य जाणून न घेता अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेले मंडळी, आयत्या कामावर रेगा ओढणारी मंडळी, खोट बोल पण रेटून बोल, स्वतःचे आत्मविश्वास घाण ठेवून इतरांच्या कामावर बोटे दाखवून प्रसिद्धी मिळवून घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळे मनाला वाटेल ते बरळून वास्तव सत्याला तिलांजली देऊन सामाजिक कामात ही राजकारणाचा शिरकाव करून इतरांचे घरे जाळून शेकत बसणारे आणि चांगल्या कामाला वेगळ्या पद्धतीने प्रसार करून स्वतःची वाहवा करून घेणारे आदी स्वतःतील कमतरता तपासावे नंतर इतरांना संदेश द्यावे, नाहीतरी आता सद्याची परिस्थिती ही अशी आहे माल खाये मदारी, नाच करे बंदर, मंजूर झालेले कामाचा विषय बनवण्यापेक्षा नवीन कामाला मंजुरी मिळवून आपले शहर व परिसराचा विकास कसे करता येईल यावर लक्ष दिले तर निदान जनतेचा ही कौल आपल्याला मिळेल, नाहीतर सद्या चालू असलेली परिस्थिती “घर का बेदी लंका ढाये” कायम चालू राहील.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment