लसीकरणास पहिली नोंदणी, पहिले लसीकरण कार्यपद्धती राबवण्याचे मागणी पुराणे यांचे प्रधानमंत्री मोदी यांच्याकडे मागणी
मुरूम ता.१०, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर लसीकरण चालू आहे, सद्या सर्वत्र लसीचा तुटवडा असल्यामुळे पहिले डोस घेतलेल्या अनेक नागरिकांना अद्याप दुसरे डोस मिळाले नाही, तरी पहिल्यांदा पहिले डोस घेतलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करूनच, लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करावी.
सद्या चालू असलेल्या लसीकरण नोंदणीत, नोंदणी तर होत आहे परंतु तारीख व वेळ ठरवण्यास पोर्टल वर अडचण निर्माण होत आहेत, बुक्कड तारीख सोडून पुढच्या तारखेला एन ए ऑपशन असते आणि अचानक स्टॉक केंव्हा अपडेट करतात त्याची माहिती मिळत नाही, नागरिक मात्र पोर्टल वर वारंवार तपासणी करत असतात परंतु त्यांना पुढील तारखे मध्येही बुक्कड असेच दाखवते, म्हणून आम्ही आपणास विनंती करतोत की, पहिली नोंदणी पहिले लसीकरण हे मोहीम राबवावे, अर्थात डिजिटल ऑनलाइन नोंदणी असल्याने ते शक्य आहे, ज्या नागरिकांची आदी नोंदणी झाली त्यांचे नावे आपोआप लसीकरणसाठी तारीख व वेळ देण्यात यावी ही विनंती, फॉर्म भरून घेताना केंद्राचाही त्यावर उल्लेख करावा म्हणजे त्या व्यक्तीला त्याच केंद्रातील बुकिंग देण्यास सोपे जाईल. असे निवेदन बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी प्रधानमंत्री व केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे केली आहे.
सद्या लसीकरणासाठी शासनाचे योग्य नियोजन दिसून येत नाही, पहिल्या डोस घेतलेले अनेक नागरिक दुसऱ्या डोस पासून वंचीत आहेत, त्यांना सोडून सरकार घाई करत १८ वयाच्या पुढील नागरिकांना लसीकरण मोहीम हाती घेतले असल्याचे घोषणा जरी केली असली तरी ती घोषणा पोकळ निघाली, हातात स्टॉक नसताना, आम्ही नागरिकांसाठी काय तरी धडपड करीत आहोत असे भास केंद्र सरकारने निर्माण केले आहे, मुळात कृती मात्र काही दिसून येत नाही, आदीच बस सेवा असल्याने केंद्राच्या आजूबाजू च्या गावातील नागरिकांना लसीकरण केंद्राला ये जा करण्यास अडचण निर्माण होत आहेत, त्यात केंद्रावर आल्यावर लस नाही म्हणून हाकलून देण्यात येत आहे, थोडक्यात म्हणायचे झाले तर नागरिकांचे एक प्रकारे हेळसांड होत आहे, लसीकरणाच्या बाबतीतही, नोंदणी केल्यानंतर तारिख व वेळ निश्चित करण्यास अडचणी येत आहेत, तारीख व वेळ आदी पासूनच बुक्कड दिसून येत आहेत, पुढील तारखेला बुक करायचे झालं तर त्यात सेसन नॉट अवेलेबल असे येते, वारंवार प्रयत्न करून ही तारीख वेळ भेटत नाही, आणि अचानकपणे स्टॉक अपडेट केला जात आहे आणि लगेच बुक्कड म्हणून दाखवत आहे याचा अर्थ यात ही फार मोठे झोल असल्याचे दिसून येते. या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रधानमंत्री व केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे पत्र पाठवून पाठपुरावा करत आहोत. रामलिंग पुराणे समाजसेवक
Leave A Comment