शहरात पाच कोरोना पॉजिटिव्ह, जनता कर्फुला उत्स्फूर्त प्रतिसाद, कोव्हीशिल्ड लस घेण्याचे आवाहन, नागरिकांचा विना मास्क वावर..!

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

शहरात पाच कोरोना पॉजिटिव्ह, जनता कर्फुला उत्स्फूर्त प्रतिसाद, कोव्हीशिल्ड लस घेण्याचे आवाहन, नागरिकांचा विना मास्क वावर..!

मुरूम ता.०५, गतवर्षीच्या तुलनेत कोरोणाच्या २०२० च्या महामारीत मुरूम शहरात तब्बल ४ महिन्यांनी कोरोना रुग्ण आढळला होता, दि.०३ एप्रिल २०२० रोजी जिल्ह्यात पहिला कोरोना पोजिटिव्ह रुग्ण आढळून आला होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत मुरूम शहरातील कोरोनाचे प्रादुर्भाव लक्षात घेता मार्च महिन्यापासूनच कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाले याआधी ०३ रुग्ण कोरोना पोजिटिव्ह आले होते ते उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले.

दि. ०३ एप्रिल रोजी शहरात ०४ कोरोना पोजिटिव्ह रुग्ण व दि.०४ रोजी ०१ रॅपिड अँटीजन तपासणीत आढळले असून भीम नगर, धनगर गल्ली, नाईक नगर व ग्रामीण रुग्णालय कर्मचाऱ्याची पत्नी, अशोक चौक असे एकूण पाच कोरोना पोजिटिव्ह रुग्ण सद्या मुरूम येथील कोव्हिड केअर सेन्टर मध्ये उपचार घेत असल्याची अधिकृत माहिती मुरूम ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधिकारी डॉ. सत्यजित डुकरे यांनी दिली.

धनगर गल्लीतील महिला उपचार घेण्यास व दवाखान्यात जाण्यास टाळा टाळा करत होती, तिला घरातून अंबुलन्स मधून दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी ग्रामीण रुग्णालय कर्मचाऱ्यांना मोठे संघर्ष करावे लागले, शेवटी नगरसेवक व पोलीस प्रशासनाच्या मदतीने अखेर त्या महिलेस उपचारासाठी दाखल करण्यात आले.

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार दर रविवारीच्या जनता कर्फुला मुरूम शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, व्यापारी वर्गाने सर्व व्यापार दुकाने बंद ठेवण्यात आले होते तर नागरिकांनीही या जनता कर्फुला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कोरोनाचे वाढते प्रादुर्भाव लक्षात घेता, मुरूम शहरातील नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, दि.०३ रोजीचे मुरूम शहरातील एका ४५ वयाच्या महिलेचा उस्मानाबाद येथे कोरोना वर उपचार घेत असताना मयत व तसेच दि.०४ रोजी त्या महिलेची आई वय ७५ हिचेही मयत झाल्याचेही चर्चा नागरिकांतून होत आहे परंतु त्याची नोंद मुरूम ग्रामीण रुग्णालयात नाही.

वयाच्या ४५ वर्षा पुढील नागरिकांना कॉव्हीशिल्ड लसीकरण चालू असून आतापर्यंत ६३५ नागरिकांनी ही लस घेतली असून आनखिन जास्त प्रमाणात नागरिकांनी लसीकरणात सहभाग घेण्यासाठी स्थानिक नगर परिषद प्रशासनाने किंवा त्या त्या वॉर्डातील नगरसेवकाने पुढाकार घेऊन जनजागृती करणे गरजेचे आहे.

शहरात आजही जवळपास ९० टक्के नागरिक हे विना मास्क वावरताना दिसून येत आहेत, स्थानिक नगर परिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.

संध्याकाळी ०७ वाजल्यापासून चालू झालेल्या संचारबंदीस मात्र शहरातील व्यापारी वर्ग, नागरिक याचे विरोध करत असल्याचे निदर्शनास आले, मुरूम शहर व परिसरात जवळपास ८० ते ८५ टक्के नागरिक हे शेतकरी आहेत त्यामुळे ते सकाळ पासूनच शेती कामात व्यस्त असतात आणि संध्याकाळी ते बाजार साठी येत असतात, परंतु संध्याकाळी बाजर बंद झाले तर त्यांचे नक्की हाल होणार अशी चर्चा जनतेतून केली जात आहे व तसेच उन्हाळा दिवस असल्याने दिवसभर व्यापार न होता व्यापाराची वेळ संध्याकाळची असल्याने जिल्हाधिकारी यांनी याचा विचार करून वेळेत बदल करावे असे ही नागरिक व व्यापारी वर्गातून चर्चा होत आहे, व तसेच छोटे व्यवसायावर ही बंदी आल्याने छोटे व्यवसायिक व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे तरी ती बंदी जिल्हाधिकारी यांनी हटवावी असेही चर्चा होत आहे.

स्थानीक ग्रामीण रुग्णालय, नगर परिषद व पोलीस प्रशासन मध्ये मात्र टीम वर्क होताना दिसून येत नाही. टीम वर्क व तिघांमध्ये समजूतदार पणे कार्य होणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात कोरोणाचे संकट वाढन्या आदी त्यावर वेळेत आळा घालणे गरजेचे आहे. नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करणेही गरजेचे आहे.

 

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment