उमरगा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या निधीतून मुरूम शहरातील विविध कामासाठी ३० लक्ष रुपये निधी

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

उमरगा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या निधीतून मुरूम शहरातील विविध कामासाठी ३० लक्ष रुपये निधी

उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले व धाराशिव जिल्ह्याचे युवानेते किरण गायकवाड यांनी दिलेला शब्द पाळलाच नाहितर पूर्ण केला असल्याचे मत मुरूम शिवसैनिकानी मांडली,
मुरुम शहरातील किसान चौक येथील ईतिहास कालिन किसान व्यायाम शाळेची दुरावस्था झाली असता तरुणांनी पुढाकार घेउन आमदार चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांच्या समोर हा प्रश्न मांडला व त्यांनी देखिल शब्द दिला होता तो पुर्ण केला , किसान व्यायाम शाळेसाठी १० लक्ष निधी मंजूर करुन दिला व तसेच मुरुम शहरातील पवित्र देवस्थान असलेले आई आंबाबाई मंदिर सभागृहसाठि १० लक्ष व महादेव नगर भागातील मुस्लिम कब्रस्तानच्या कंपाउंडवॉल साठि १० लक्ष निधी मंजूर करण्यात आली आहे. शिवसेना तालुका प्रमुख माजि नगरसेवक चंद्रशेखर मुदकण्णा व त्यांच्या सहकारी शिवसैनिकांच्या मागनी नुसार आमदार चौगुले यांनी त्या पुर्ण करित मुरुम शहराच्या विकासासाठी ३० लक्ष निधि दिला असुन त्याचे मंजुरी पत्र दिनांक १८/०८/२०२१ रोजी मुरुम न प मुख्याधिकारी श्री. केरुरकर साहेबाना सुपूर्द केला व तसेच लवकरात लवकर या विकास कार्याला मंजुरी देउन आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली यावेळी , शिवसेना तालुका उपप्रमुख चंद्रशेखर मुदकण्णा ,नगरसेवक अजित चौधरी , श्रीकांतजी मिनियार ,प्रा. दत्तात्रय ईंगळे, विठ्ठल पाटील , गुलाब डोंगरे ,युवासेना शहर प्रमुख प्रल्हाद (भगत) माळी , मिडिया प्रमुख जगदीश निंबर्गे , मोहन जाधव ,रफिक पटेल रवीकिरण अंबुसे ,श्रीधर ईंगळे , बाबासाहेब कटारे आदि उपस्थित होते शहर विकासाच्या विषयावर चर्चा देखिल करण्यात आली.
आमदार ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांचे समस्त मुरुमकरांच्या व शिवसेना युवासेना ,भारतिय विध्यार्थी सेना ,शिवसेना महिला आघाडीच्या वतिने आभार मानण्यात आले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment