भूकंपग्रस्तांना न्याय द्या,लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

भूकंपग्रस्तांना न्याय द्या,लोककल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

उस्मानाबाद :- ता. २५, 30 सप्टेंबर 1993 साली लातुर व उस्मानाबाद जिल्ह्यातील भुकंपात 52 खेडे गावात मोठ्या प्रमाणात मानव हानी झाली होती. अशा वेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी निर्णय घेऊन घरातील एका व्यक्तीला शासकीय नौकरीत समाविष्ट करुन घेण्यात यावे असा जि.आर. काडुन 52 खेड्यातील कुटुंब प्रमुखांच्या एका पाल्याला जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत काही कागदपत्रांच्या आधारे भुकंपग्रस्त प्रमाणपत्र देण्यात आली. याच प्रमाणपत्राच्या आधारावर काही जणांना सरळसेवा मार्फत सरकारी नोकरी मिळाली व काही प्रमाणपत्र धारक नौकरी च्या आशेवर एजबार होत आहेत. अशा नौकरीच्या आशेवर बसलेल्या भुकंपग्रस्त प्रमाणपत्र धारकांना येणाऱ्या सरकारी भरती मध्ये 2% बरोबर आरक्षण देऊन सरळसेवा मार्फत भरती प्रक्रिया राबवुन भुकंपग्रस्तांना न्याय मिळावे यासाठी लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांना निवेदन देण्यात आले यावेळी लोककल्याण कृती समितीचे अध्यक्ष रवि दासमे,सह्याद्री प्रतिष्ठानचे तालुका प्रमुख भगत माळी,किरण दासमे,महेश कुंभार,महादेव कारभारी, लोककल्याण चे अध्यक्ष विक्रम दासमे,आकाश राजे,बालाजी होनाजे व इतर भुकंपग्रस्त प्रमाणपत्र धारक उपस्थित होते.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment