पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळाचा गौरव….
मुरूम ता.२२, गणेशोत्सवा निमित्त विविध सामाजिक,सांस्कृतिक, देखावे सादर करत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळाना मुरूम पोलीस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, मुरूम पोलीस स्टेशनचे सह्ययक पोलीस निरीक्षक डॉ.रंगनाथ जगताप, सह्ययक पोलीस निरीक्षक पी पी इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२२ रोजी चषक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुरूम शहर, मुरूम ग्रामीण, व एक गाव एक गणपती उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांना सन्मानपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. सामाजिक सलोका, कायदा व सुव्यवस्था याचे पालन करत मुरूम शहर व परिसरातील गणेश मंडळानी विविध सामाजिक,सांस्कृतिक उपक्रम राबवत यंदाचा गणेश उत्सव साजरा केला याचे दखल घेत मुरूम पोलीस प्रशासनाच्या वतीने सन्मान गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात मुरूम शहरातील किसान गणेश मंडळाला जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आल्याने त्यांचा येतोचित्त सत्कार करण्यात आले व त्याच मुरूम शहरातुन बालाजी गणेश मंडळ यांनी प्रथम क्रमांक, शास्त्रीनगर गणेश मंडळ द्वितीय क्रमांक तर हनुमान चौक गणेश मंडळाने तृतीय क्रमांक पटकावले. मुरूम ग्रामीण भागातून बलराम गणेश मंडळ,येनेगुर प्रथम क्रमांक, चौगुले वस्ती गणेश मंडळ,तुंगाव आणि जगदंब प्रतिष्ठाण कडदोरा यांनी द्वितीय क्रमांक तर जय हनुमान गणेश मंडळ येनेगुर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. मुरूम पोलीस क्षेत्रात २९ गावपैकी ९ गणेश मंडळांकडून एक गाव एक गणपती उपक्रम राबवले त्यात दस्तापुर,गणेश नगर,वरणाळ वाडी, कोळनूर पांढरी,महालिंगराय वाडी नळवाडी,फुलसिंग, कोराळ आदी गावांचा समावेश आहे, त्याचबरोबर उत्तेजनार्थ आलेल्या गणेश मंडळाचाही उपविभागीय पोलीस अधिकारी बरकते यांच्या हस्ते चषक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले, यावेळी मंडळाच्या प्रतिनिधीने आपले मनोगत व्यक्त केले. मुरूम शहरातील वादग्रस्त भागातील सायलेंट झोन पुढील वर्षी राहणार नसल्याची घोषणा यावेळी सह्ययक पोलीस निरीक्षक डॉ. जगताप यांनी केले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मंडळाला शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त करत ज्यांना पारितोषिक मिळाले नाही त्यांनी नाराज न होता आनखीन उत्कृष्ट कामगिरी करावे असे अवहान केले. मुरूम शहर,परिसरातील गणेश मंडळ,पोलीस पाटील,पोलीस कर्मचारी सह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
Leave A Comment