प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी बसवराज पाटील यांची निवड झाल्या बद्ल येणेगुर ग्रामस्थांकडून भव्य सत्कार

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी बसवराज पाटील यांची निवड झाल्या बद्ल येणेगुर ग्रामस्थांकडून भव्य सत्कार

मुरूम, ता. ३१ (बातमीदार) : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी बसवराज पाटील यांची निवड झाल्याबद्दल येणेगुर काँग्रेस कमिटीच्या वतीने पाटील यांच्या निवासस्थानी यथोचित सत्कार मंगळवारी (ता. ३०) रोजी करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भालेराव, पंचायत समिती सभापती सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बसवराज पाटील व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील या दोघांचाही शाल व भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी विजय सोनकटाळे, सोमशंकर पाटील, शंकर हुळमुजगे, व्यंकट बिराजदार, सौरंभ उटगे, संदीप बिराजदार, सौरव बिराजदार, साई बिराजदार, धनराज बिराजदार, संजय बिराजदार, शेषेराव पाटील, संभाजी पाटील, राम हंगरगे, महेश टोम्पे, शुभम बोडके, म्हणतेश कस्तुरे, अविनाश माळी, राजकुमार जोशी, वैजीनाथ पाटील, समध वरनाळे, अरबाज माळवाले, तय्यब फरकानडे, युसूफ मुल्ला, बालाजी धामशेट्टी, शुभम सुरवसे, मोहद्दीन मटके, महेश माळी, महेश स्वामी, सागर माळी, सागर पांचाळ, कादर जवळगे, संतोष मुदकण्णा, दत्ता जगताप, स्वप्नील माळी, साई पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शरद गायकवाड तर आभार रफिक तांबोळी यांनी मानले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment