मुरूम : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात आयोजित एक दिवशीय भाषण संभाषण कार्यशाळा गुरुवारी (ता.३०) रोजी संपन्न झाली. या कार्यशाळेत प्रा.डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेत महाराष्ट्रासह दिल्ली, पंजाब, जम्मू काश्मीर अशा विविध राज्यातून १०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदवून चर्चात्मकरित्या प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणामध्ये विविध क्षेत्रातील मंडळींचा सहभाग राहीला. यावेळी शिक्षक, प्राध्यापक, वकील, इंजिनियर, डॉक्टर असलेल्या लोकांचा प्रमुख सहभाग होता. यावेळी डॉ.हुलपल्ले यांनी आपण व्यासपीठावर कसे बोलावे, माइक समोर कसे उभे राहावे, आपली शब्दरचना, शब्द उच्चार, आवाजातील चढ-उतार, आपले चेहऱ्यावरील हावभाव आदि बाबींचे प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात आले. आपण एखाद्या लग्न सोहळ्यामध्ये सहभागी असताना शुभेच्छा कशा द्याव्यात.
श्रोते बदलले की, आपले भाषण बदलते, श्रोत्यांचा वर्ग कोणता आहे, त्यांचे वय काय आहे, या गोष्टी पाहून वक्त्याला भाषण करावे लागते. तरच ते भाषण प्रभावी भाषण ठरू शकते. व बराच काळ लोकांच्या लक्षातही राहू शकते. ही कार्यशाळा सर्वांसाठीच खूप उपयोगी व गरजेची असल्याच्या प्रतिक्रिया सहभागी प्रशिक्षणार्थीनी दिल्या. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक सपाटे होते. या कार्यशाळेसाठी संगणक विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सचिन राजमाने, प्रा.लखन पवार, डॉ.महेश मोटे, डॉ.सुधीर पंचगल्ले यांनी पुढाकार घेवून कार्यशाळा यशस्वी केली.
Leave A Comment