तृतीयपंथीसाठी कायदे व आरोग्यविषयी मार्गदर्शन शिबीर संपन्न….

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

तृतीयपंथीसाठी कायदे व आरोग्यविषयी मार्गदर्शन शिबीर संपन्न….

उमरगा ता.२३, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, उमानाबाद ‘सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय उस्मानाबाद व एकता बहुउद्देशीय महीला मंडळ लातूर आणि उपजिल्हा रुग्णालय आयसिटीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या सेवा पंधरवाडा अभिमान अंतर्गत दि. २३ सप्टेंबर रोजी उमरगा येथे उमरगा तालुक्यातील तृतीय पंथीना आरोग्य विषयी, कायदे विषयी, शासनाच्या विविध योजना, त्यांचे हक्क व कायदेविषयक शीबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथील वैधकीय आधिकारी डॉ. विकास सुभेदार, तर प्रमुख पाहुणे व कायदे विषयक तज्ञ अँड सुशिल कुमार शिंदे यांची उपस्थिती होती.
या शिबिरात डॉ सुभेदार यांनी तृतीयपंथीच्या आरोग्यविषयी मार्गदर्शन केले व चर्चा केली.
तर प्रमुख पाहुणे अँड, सुशिल शिंदे यांनी तृतीयपंथीचे हक्क कायदेविषयक मार्गदर्शन केले.
शिबिरा दरम्यान २० तृतीयपंथीने आपले आरोग्य तपासणी करून घेतले. कार्यक्रमास जिल्हा सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाचे मगर व जेजुरे मैडम उपस्थीत होते.
सौ. अनिता निकते, प्रकल्प समन्वय एकता बहुउद्देशिय सेवा महिला मंडळ यांनी यां कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रस्तावना केली तर तृतीयपंथीचे गुरुमाया पटेल यांनी आभार मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समुपदेशक अभय भालेराव ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ सोहल तांबोळी आदींनी परिश्रम घेतले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment