गुरुकुल प्री-प्रायमरी शाळेचे वार्षिक स्नेह सम्मेलन उत्साहात संपन्न…. हिंदी,मराठी गीताच्या तालावर नृत्यांनी चिमुकल्यानी जिंकले मने…

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5
(1)

गुरुकुल प्री-प्रायमरी शाळेचे वार्षिक स्नेह सम्मेलन उत्साहात संपन्न….

हिंदी,मराठी गीताच्या तालावर नृत्यांनी चिमुकल्यानी जिंकले मने…

मुरूम ता.१३, येथील गुरुकुल प्री-प्रायमरी शाळेचे वार्षिक स्नेह सम्मेलन कार्यक्रम दि.१२ रोजी मुरूम येथील कला,विज्ञान व वाणिज्य जुनीअर कॉलेजच्या प्रागंणात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपतालुका प्रमुख तळूजापूरचे राजेंद्र मोरे होते, सेवाग्राम कनिष्ट महाविद्यालयचे प्राचार्य अनंत कवठे, आलूर माजी उपसरपंच राजकुमार माने, पोलीस कॉन्स्टेबल बळीराम लोंढे, डॉ.सुवर्णा पाटील,विनोद पोतदार,प्रसाद इंगोले,महादेवी स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून द्वीपप्रजवलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वर्षभरात उल्लेखनीय उपस्थिती,सण-उत्सव प्रसंगी विविध कला गुणांचे सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थी व त्याचबरोबर प्रत्येक वर्गातून निवड झालेल्या वार्षिक आदर्श चिमुकल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. माऊलीचे पालखी घेऊन चिमुकले वारकरी माऊली माऊलीच्या गजरात विठ्ठल विठ्ठल नामाच्या जयघोषात निघाले पंढरपुरी या सादरीकरनाणे वार्षिक स्नेह सम्मेलन सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुरुवात झाले. चिमुकल्यानी विविध हिंदी मराठी गीताच्या तालावर सुंदर नृत्य सादरीकरण करीत उपस्थित पालक,प्रेक्षकांची मने जिंकली. विठ्ठल विठ्ठल, मेरा नाम चून चुन, मला लागली उचकी कोणाची,कोरोनाच्या काळात योगदान दिलेल्या डॉक्टर,पोलीस प्रशासन स्तुतीपर गीत, हवा हवाई,सेल्फी लेले,गलतीसे मिस्टेक यासह अनेक मराठी,हिंदी गीताच्या तालावर चिमुकल्यानी ठेका धरत सुंदर असे नृत्य सादर करीत आपल्या अंगी असलेल्या कला गुणांना उजाळा दिला. शिक्षक कर्मचारी मयुरी चौधरी,पोतदार अर्पणा,सोबाजी सुनीता,रंजना कुंभार,वडतीले सुनीता,रोळे ऐश्वर्या,नूरसे रियाज आदींनी चिमुकले विद्यार्थी सुंदर नृत्य सादरीकरण करावे यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी चौधरी, प्रास्तविक आनंद चौधरी तर आभार भूषण मडोळी यांनी मानले, बालाजी राठोड,विशाल व्हनाळे, माधवी मडोळी आदींचे विशेष सहकार्य लाभले.गुरुकुल प्री प्रायमरी शाळेच्या वतीने संपन्न झालेल्या सण-२०२२-२३ या वार्षिक स्नेह सम्मेलन कार्यक्रम साठी पालक,प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment