मा. शरणजी पाटील साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
युवकांचे प्रेरणास्थान……. युवानेते शरणजी पाटील मुरूम येथील कै.माधवराव पाटील उर्फ काका यांचा राजकीय वसा व वारसा लाभलेल्या सधन शेतकरी, शिक्षणप्रेमी व जनसामान्यांचे कैवारी असलेल्या पाटील परिवारात शरणजी पाटील यांचा जन्म ६ सप्टेंबर १९८८ मध्ये झाला. त्यांना बालपणी कुटुंबातूनच सामाजिक,राजकीय परंपरेचे बाळकडू मिळाले. आजोबा कै.माधवराव पाटील, वडील माजी राज्यमंत्री तथा प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे बसवराजजी पाटील व चुलते जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुरावजी पाटील यांनी सुरू ठेवलेल्या शैक्षणिक, सहकार,औद्योगिक, सामाजिक व राजकीय परंपरेचा वारसा पुढे घेऊन राज्याच्या राजकारणात त्यांनी एक प्रभावी नेतृत्व निर्माण केले आहे. हाच पूरक विचार घेऊन राजकारणात सक्रिय राहून सामान्यांच्या प्रश्नांना न्याय व युवकांमध्ये संवाद साधण्याचे कार्य ते जोमाने करीत आहेत. समाजकारणाबरोबरच राजकारणात बांधिलकीच्या भावनेतून युवकांमध्ये नीतिमूल्यांची धडे, गोरगरीब, कष्टकरी, उपेक्षित व आर्थिक दृष्ट्या कमकुवत युवकांना संघटित करून समाजातील ज्वलंत प्रश्नावर चर्चा घडविण्यासाठी या परिसरात शरणजी पाटील विचारमंच स्थापन करून त्या माध्यमातून समाजात होत असलेले अन्याय,अत्याचार गुन्हेगारी प्रवृत्ती, शोषण थांबून समाज व राजकारण अधिक स्वच्छ व पारदर्शक बनविण्याकरिता युवकांना संघटीत व कटिबद्ध करण्याचा प्रयत्न सातत्याने ते करीत आहेत. जोपर्यंत युवा पिढी सक्रिय राजकारणात सहभागी होणार नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही. यासाठी ते सतत युवकांना दिशा व मार्गदर्शन करीत असतात. जिल्ह्यात युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण जिल्हाच नव्हे तर मराठवाडाभर काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी व तरुणांचे संघटन कृतीशील रूपाने बनविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. क्रिकेटसारख्या खेळामध्ये रुची ठेवून या भागात तरुणांमध्ये आवड निर्माण व्हावी, खेळाडूवृत्ती जोपासण्यासाठी दरवर्षी माधवराव पाटील यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धांचे भव्य आयोजन केले जाते. तरुणांनी निर्व्यसनी, सशक्त, बुद्धिमान झाले पाहिजे तरच आपला परिसर व देशाचा विकास होईल आणि युवा पिढी आदर्श बनेल अशी आशा तरुणांप्रती ते सतत व्यक्त करतात आणि त्यांच्यासाठी ते सतत धडपडतात. विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन नवीन दृष्टिकोन जोपासून संशोधनवृत्ती अंगी बाळगण्याकरिता युवकांना प्रेरणा, उत्साह, जिद्द, साहस व आत्मविश्वास निर्माण करतात म्हणूनच ते युवकांचे प्रेरणास्थान बनले आहेत. जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची यशस्वी जबाबदारी शरणजी पाटील पार पाडत आहेत. ग्रामीण भागात केल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा विविध योजनांच्या निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी सभागृहात अनेक वेळा प्रश्न विचारून प्रत्यक्षात कामाच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी केलेला पाठपुरावा महत्त्वाचा ठरतो आहे. आलूर गटात विविध योजनांसाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आणखी निधीसाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. विकास कामांना प्राधान्य देऊन सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. त्यांचे नेतृत्व राज्याच्या राजकीय पटलावर नक्कीच यशाचे शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना अभिष्टचिंतन व्यक्त करत असताना त्यांचे भावी आयुष्य यशस्वी जावो ! याच मनापासून हार्दिक सदिच्छा !
प्रा.डॉ.महेश मोटे, राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर विभाग श्री माधवराव पाटील महाविद्यालय,मुरूम
Leave A Comment