सोयाबीन,उडीद पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या – लोककल्याण सामाजिक संस्था.
कोराळ ता.२०, उमरगा तालुक्यातील कोराळ व कोराळ परिसरात पावसामुळे उडीद, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सलग पाच दिवस दमदार पाऊस झाला आहे. शेताला तळ्याचे स्वरूप आल्याने पावसामुळे काढलेल्या उडदाला कोंब फुटले आहेत.ज्यांनी पिक काढले नाही त्या शेतकऱ्यांचे उडीद शेतातच पाण्यात उभे आहे.उभ्या पिकालाही कोमारे फुटले आहेत.सोयाबीनचे देखील अशीच गत झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला असल्याने शेतकरी मोठ्या आस्मानी संकटात सापडला आहे. तरी शासनाने त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
_________________________
नुकसानीचे पंचनामे करा –
पावसामुळे कोराळ व कोराळ परिसरातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे शासनाने पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी कोराळ येथील लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव रवि अशोकराव दासमे यांनी केली आहे.
Leave A Comment