शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पालिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जावुन नागरीकांची तपासणी
मुरुम ः शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पालिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जावुन नागरीकांची तपासणी करण्यात येत आहे.मुरुम ः शहरात गेल्या सहा महिन्यात बुधवारपर्यंत १८५ जणांना कोरोनाची लागण झाली होती.यातील ३७ जेष्ठांसह १७७ रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात करुन यशस्वीपणे घरी परतले आहेत.मुरुम शहरात आठ प्रभाग असून या प्रभागातील २५ गल्ल्यांमध्ये बुधवारपर्यंत १८५ रुग्ण आढळून आले आहेत.यापैकी १७७ जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.तर तीन जेष्ठांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.शहरात दहा जुलैला पहिला रुग्ण यशवंतनगर भागात आढळून आला होता.त्यानंतर अॉगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोनाने कहर केला शहराच्या विविध भागात बुधवारपर्यंत १८५ रुग्ण आढळून आले होते.त्यामुळे शहरात जवळपास ४९ प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले.कोरोनाला रोखण्यासाठी पालिका आणि आरोग्य विभागासह महसूल व पोलीस विभागाकडून शहरात विविध उपाययोजना करण्यात आले.सध्या या सर्वांच्या प्रयत्नाने शहरातील बाधितांची संख्या झपाट्याने घटली आहे.गेल्या चार दिवसात शहरात फक्त आज बुधवारी एक रुग्ण आढळून आला आहे. मंगळवारपर्यंत शहरात १८४ जणांना कोरोनाची बाधा झाली होती.आज शहारातील ग्रामीण रुग्णालयात पाच जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. यामध्ये शहरातील संभाजीनगर भागातील एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला तर अन्य चार निगेटीव्ह आले.त्यामुळे बाधितांचा आकडा एकने वाढून १८५ वर पोहचला होता.यात आत्तापर्यंत १७७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.यामध्ये ९० वर्षाच्या आजोबासह ८८ वर्षीय आजीबाईने ही कोरोनाला हरवले आहे.शहरातील विविध भागातील जवळपास ३७ जेष्ठांनी कोरोनावर मात केली आहे.यशवंतनगर , भीमनगर,सोनार गल्ली या तीन गल्ल्यातील प्रत्येकी एका जेष्ठांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.शहरातील २५ गल्ल्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते.यात यशवंतनगरमध्ये २५,भीमनगर २०, नेहरुनगर १९,टिळक चौक,संभाजीनगर प्रत्येकी१६, सोनार गल्ली १५,मुदकण्णा गल्ली १२,झुरळे गल्ली ९, नगरपरिषद भागात १२,किसान चौक ७,हनुमान चौक, शास्त्रीनगर प्रत्येकी ५ ,शेळके गल्ली ४,इंगोले गल्ली, ख्याडे गल्ली,ग्रामीण रुग्णालय येथे प्रत्येकी ३ अशोक चौक ,महादेव नगर प्रत्येकी २,नागोबा गल्ली,बसवेश्वर चौक,माळी गल्ली,सिध्दार्थ कॉलनी,सुभाष चौक येथे प्रत्येकी एक असे एकुण १८५ रुग्ण कोरोना बाधित होते.त्यापैकी जवळपास १७७ जणांनी उपचारानंतर कोरोनाला हरवले आहे.सध्या चार जणांवर कोविड सेंटरमध्ये तर एकावर उमरगा येथे उपचार सुरु आहेत.
Leave A Comment