ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा वाढल्याने आर्थिक संपन्नता वाढली- बसवराज पाटील  

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा वाढल्याने आर्थिक संपन्नता वाढली- बसवराज पाटील

मुरुम, ता. उमरगा, ता. २० (प्रतिनिधी) : गेल्या दोन वर्षापासून निसर्गाच्या कृपेने या परिसरात चांगला पाऊस झाला. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एकरी उत्पादन वाढविण्याची मोठी स्पर्धा सुरु झाली त्यातून शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संपन्नतेत भर पडल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा विठ्ठल साई कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांनी मंगळवारी (ता. २०) रोजी विठ्ठल मंदिर सभागृहात श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरुन बोलताना व्यक्त केले. प्रारंभी दिवंगत माधवराव पाटील उर्फ काका यांच्या प्रतिमेस सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरणजी पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन सादिकमियाँ काझी, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रकाश आष्टे, जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पाटील, कारखान्याचे संचालक शरणाप्पा पत्रिके, विठ्ठल पाटील, केशव पवार, माणिक राठोड, संगमेश्वर घाळे, शिवमुर्ती भांडेकर, अँड. सुभाष राजोळे, शिवलिंग माळी, दिलीप भालेराव, राजीव हेबळे, मंगलताई गरड, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, विकास हाराळकर, रफिक तांबोळी, मदन पाटील, सचिन पाटील आदींची उपस्थिती होती.    पुढे बोलताना पाटील म्हणाले की, या भागातील शेती हा मुख्य व्यवसाय असून ऊस हे नगदी पीक व हमीभाव देणारे पीक असल्याने शेतकऱ्यांनी यंदा मोठया प्रमाणात लागवड केली आहे. त्यामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. कारखाना स्थापनेच्या सुरुवातीला कारखाना परिसरात केवळ दहा हजार मेट्रीक टन ऊस उपलब्ध होता. आज मात्र १४ लाख मेट्रीक टनाने उसाचे क्षेत्र वाढले आहे. साखर कारखानदारी हे खऱ्या अर्थाने निसर्गावर अवलंबून आहे. पण या कारखानदारीला दरवर्षी विविध समस्यांना तोंड दयावे लागत आहे. ही साखर कारखानदारी टिकविणे हीच सर्वांची मोठी जबाबदारी आहे. सध्या कारखानदारी चालविणे हे मोठे आव्हान असल्याने या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विठ्ठलसाईला यापुढेही साह्य करावे. यंदा कारखान्याने सहा लाखापेक्षा अधिकचे उद्यिष्टये ठेवून गळीत हंगामासाठी नियोजनबध्द यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. आपल्या कारखान्याला नुकतीच डिस्टीलरी प्रकल्पाची मान्यता मिळाली आहे. या परिसरातील एकाही शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहणार नाही. साखर उत्पादनाबरोबरच उपपदार्थ निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यानुसार कारखाना परिसरात ६० केएलपीडी क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प उभारणी करण्यास नुकतीच मंजुरी मिळालेली आहे. जवळपास डिस्टीलरी उभारणीसाठीची सर्व औपचारिकता पूर्ण झाली असून प्रकल्प अहवालानुसार रक्कम रुपये १०० कोटी किंमतीच्या डिस्टीलरीचे काम लवकरच सुरू होणार आहे. तसेच या परिसरातील लोकांना उपयुक्त असा प्रेसमडवर आधारित ३२ कोटीचा बायो-सीएनजी प्रकल्प सुद्धा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. ऊसाचे क्षेत्र वाढल्याने कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने मशनरीमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येत असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले. सुरुवातीला कार्यकारी संचालक एम. बी. अथणी यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला व त्यानंतर अहवाल वाचन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजु पाटील यांनी तर आभार संचालक अँड. व्ही. एस. आळंगे यांनी मानले. यावेळी कारखान्याचे संचालक, सभासद, शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील विठ्ठलसाई कारखान्याच्या सर्वसाधारण सभेप्रसंगी बसवराज पाटील बोलताना बापूराव पाटील, शरणजी पाटील, सादिकमियाँ काझी, शरणाप्पा पत्रिके, एम. बी. अथनी आदी.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment